Header Ads Widget

काँग्रेस राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी यांचे जिल्ह्यात आगमन होत असल्यामुळे राजकीय पुढाऱ्याना स्वा. रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांच्या कार्याची येतोय आठवण !!

     माधव पवार 
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री तथा मा. सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री तथा मा. खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान माजी आमदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अख्या जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची टीम गांधीच्या भारत जोडो पदयात्रेसाठी जोरदार तय्यारी केली आहेकाँग्रेस पक्षाचे निष्ठावंत जिल्हा परिषदेची माजी अध्यक्ष स्वा. रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांची सदरच्या पद यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्याना आठवण येत असून रावसाहेब पाटील मोरे टाकळी राहिले असते तर काँग्रेस पक्षाची फळी तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गटातील मजबूत दिसली असती एकूण दहा हाजार काँग्रेस कार्यकर्त्याचा समूह खासदार राहुल गांधी यांच्या पदयात्रेत सहभागी झाला असता दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ रोजी खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पद यात्रेचे आगमन होत आहे
काँग्रेस राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी यांचे जिल्ह्यात आगमन होत असल्यामुळे राजकीय पुढाऱ्याना स्वा. रावसाहेब पाटील मोरे यांच्या कार्याची आठवण या पद यात्रेच्या निमित्ताने आली आहे

नांदेड जिल्ह्यात भारत जोडोचे होल्डिंग अर्थात बॅनर लागले आहेत राज्य महामार्गांवर सुद्धा मोठया प्रमाणात बॅनर बाजी लागली असल्याचे दिसून येत असून माजी नांदेड जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष स्वा. रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांचे सुपुत्र मनोज पाटील टाकळीकर यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो पद यात्रेत नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मनोज पाटील टाकळीकर यांनी केले आहे



Post a Comment

0 Comments