माधव पवार
खासदार राहुल गांधी यांच्या पदयात्रेत बरबडा सर्कल मधून काँग्रेसचे पाच हजार कार्यकर्ते सहभाग घेणार बालाजी मदेवाड यांनी नायगाव फास्ट न्यूजला माहिती
दिली आहे
जिल्ह्यातील सर्वच राजकीय पुढाऱ्याचे लक्ष लागून राहणाऱ्या नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल मधून काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या पदयात्रेच्या निमित्ताने सदरच्या यात्रेत पाच हाजार काँग्रेसचे कार्यकर्ते सहभाग घेणार आहेत
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नायगाव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षाचे उत्कृष्ट पणे काम करणारे बरबड्याचे माजी सरपंच तथा काँग्रेस कार्यकर्ते बालाजी मदेवाड यांनी माहिती दिली आहे
बरबडा नगरीचे माजी सरपंच तथा काँग्रेसचे कार्यकर्ते बालाजी मदेवाड यांनी सदरची माहिती दिली आणि जास्तीत जास्त काँग्रेस कार्यकर्तेयांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे
तालुक्यातील बरबडा सर्कल मधून म्हणजे बरबडा सोमठाणा वजीरगाव टाकळी अंतरगाव मनुर सावरखेड कृष्णुर निळेगव्हाण हिप्परगा मांडणी रुई बुद्रुक पाटोदा त ब, बरबडा वाडी आदी गावातून काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेचे नांदेड जिल्ह्यात लवकरच आगमन होत असल्याने या सदरच्या पदयात्रेत बरबडा जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पाच हजार कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे

0 Comments