Header Ads Widget

नायगाव ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांचा बेजबाबदार पणा या पुरवठा योजना विहिरीचे बांधकाम अर्धवट ! नागरिकांना मुबलक पाणी मिळेना -

    
      माधव पवार 
नायगाव ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांचा बेजबाबदार पणा या पुरवठा योजना - 
विहिरीचे बांधकाम अर्धवट ! नागरिकांना मुबलक पाणी  मिळत नसल्यामुळे सदरच्या योजनेचा गावातील नागरिकांना होत नसल्यामुळे आणि सदरचे गुत्तेदारा मार्फत केल्यामुळे सदरच्या विभाग अधिकाऱ्याचा कर्मचाऱ्याचा आजेब कारभार समोर आला असून सदरच्या योजनेचे काम कधी पूर्ण करणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे

नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात जिल्हा परिषद ग्रामीण पानी पुरवठा विभाग नायगावच्या अधिकाऱ्याच्या बेजबाबदार पणामुळे खेड्या पाड्यातील नागरिकांना भर उन्हाळ्यात विविध योजनेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या पाणी पुरवठ्याच्या विहिरी व टॉक्या अर्धवट अवस्थेत असल्यामुळे मुबलक पाणी मिळत दरवर्षी मिळत नाही सदरच्या योजनेचे कामे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग नायगावच्या अधिकाऱ्यानी पूर्ण करावेत अशी मागणी जोर धरीत आहे

तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गटात तत्कालीन जिल्हा परिषदेचे जी.प. सदस्य विद्यमान बालाजी बच्चेवार यांच्या माध्यमातून सन २०१२ ते २०१३ मध्ये विविध योजने अंतर्गत पाणी पुरवठा करण्यात यावा म्हणून निधी जिल्हा परिषदच्या मार्फत उपलब्ध करून दिला होता परंतु त्या योजनेचे अध्याप काम पूर्ण करण्यात आले नाही अनेक गावांत पाणी पुरवठा करण्यासाठी पाईप लाईन करण्यात आली नाही टॉकी पूर्ण करून रंगरांगोटी करण्यात आली नाही विहिरीचे ही काम करण्यात आली नसल्याने नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे

Post a Comment

0 Comments