Header Ads Widget

सरसम येथून अंत्यविधी करून परत येणाऱ्या स्वर्ग रथाचा दारूम उलुम जवळ भीषण अपघात - ५ गंभीर जखमींना नांदेड शासकीय रुग्णालयात रेफर १२ लोकांना हिमायतनगर येथे उपचार चालू :



हिमायतनगर : नागोराव शिंदे :-

हिमायतनगर सरसम बुद्रुक येथे अंत्यविधी करून परत येत असणाऱ्या स्वर्ग रथाचा हिमायतनगर जवळील दारूम उलुम येथे भीषण अपघात झाला आहेयात १२  जण  जखमी झाले. यातील गंभीर रुग्णांना रुग्णालयात हलवण्यात आले असून याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बुद्रुक येथे परसराम कांबळे यांच्या अंत्यविधी उरकून धानोरा चातारी खरूज उमरखेड येथील पाहुणे मंडळी  हिमायतनगर कडे स्वर्ग रथाने येत असताना राष्ट्रीय महामार्गावरील खडकी पाट्या समोरील दारू उलुम येथे स्वर्ग रथामध्ये बिघाड झाल्यामुळे तो पलटी झाला आहे 
यात प्रवास करणारे ८ ज्येष्ठ महिला व ४ पुरुष हे जखमी झाले असून या मध्ये सुनंदा दिलीप कांबळे चातारी वय ४० दिलीप कांबळे चातारी मिराबाई पांडुरंग तुळशे धानोरा हिमायतनगर वय ५५ पुनर्ता भारत साखरे गांजेगाव तालुका उमरखेड वय ५७  गंगाराम संभाजी कांबळे खरुस तालुका उमरखेड वय ७५ सुदाम बाळू वाठोरे राहणार खरूस तालुका उमरखेड वय ६५ पांडुरंग दत्ता वाठोरे राहणार सिरंजनी तालुका हिमायतनगर व ६७ वच्‍छलाबाई पांडुरंग वाठोरे राहणार शिरंजनी येथील आहेत 

तालुका हिमायतनगर प्रयागबाई प्रल्हाद तुळशे राहणार धानोरा तालुका हिमायतनगर वय ६० वर्ष, शांताबाई दिगंबर तुळशे राहणार धानोरा तालुका हिमायतनगर वय ६२ सगुना मधुकर तुळशे राहणार धानोरा वय ३५ संगीताबाई उत्तम तुळशे राहणार धानोरा वय ४६ हे जखमी झाले असल्याचे सांगण्यात येते 
या सर्व जखमी रुग्णांना हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून यातील ५ गंभीर जखमी रुग्णांना नांदेडला रवाना करण्यात आले आहे

यावेळी वैद्यकीय अधिकारी भुरके यांनी जखमी रुग्णांची तपासणी केली असून यावेळी हिमायतनगर पोलीस स्टेशनचे हिमायतनगर ते बीट जमादार अशोक शिंगणवाड यांनी येऊन भेट दिली आहे
यावेळी जखमी रुग्णांच्या मदतीसाठी हिमायतनगर येथील भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी युवक काँग्रेसचे योगेश चिलकावार, मराठा साम्राज्याची जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना भाऊ शिंदे, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नायगाव फास्ट न्यूजचे विशेष हिमायतनगरचे तालुका प्रतिनिधी नागोराव शिंदे, तालुका उपाध्यक्ष गंगाधर गायकवाड, लोकस्वराज्य आंदोलनाचे तालुका अध्यक्ष  धोंडोपंत बनसोडे, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका संघटक विजय वाठोरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

Post a Comment

0 Comments