बरबडा :- किरण हणमते :-
बरबडा येथे डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परिक्षा २०२२ - २३ मध्ये घेण्यात आली. हि परिक्षा केंद्र म्हणून ग्रामीण भागातील भव्य असणारी जवाहरलाल नेहरू विद्यालयामध्ये शनिवारी होमी भाभा परिक्षा दुपारी ३ वाजता घेण्यात आली. या परीक्षेसाठी ग्रामीण भागात या परीक्षेचे परीक्षा केंद्र आल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना सोयीस्कर ठरले असल्याचे पालकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
या परिक्षा केंद्रावर एकतीस शाळेचे विद्यार्थी परिक्षा देण्यासाठी आले असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. या परीक्षेसाठी एकूण २८३ विद्यार्थी बसले आहेत. त्यामध्ये नांदेड, नायगाव यांच्या सह इतर शाळेतील विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते
-------------------------------------------------------------------
या परीक्षेसाठी ७ हॉल होते. त्यामध्ये प्रत्येकी हॉल विद्यार्थी आसन व्यवस्था केली होती. या परीक्षा सुरळीत होण्यासाठी शाळेचे उपमुख्याध्यापक गणेश बडूरे यांच्या उत्कृष्ट नियोजना खाली शाळेतील सर्व शिक्षकांनी उत्तम रित्या काम केले आहे
-------------------------------------------------------------------
त्यात ६ वी मराठी माध्यम ३९ तर इंग्रजी माध्यम ८४ तसेच ९ वी चे मराठी माध्यम ४५ आणि इंग्रजी माध्यम ११५ एवढ्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे
--------------------------------------------------------------------
यामध्ये केंद्रप्रमुख म्हणुन शाळेचे उपमुख्याध्यापक जि. पि. बडूरे होते तर त्यांना सहाय्यक म्हणुन माधव कंडापल्ले, महेश नलबलवार, प्रा.शिवाजी हंबर्डे, मुदखेडे, एन. एम. तिप्पलवाड, राजेश्वर भुसलवाड, अशोक बक्केवाड, विद्या हनमंते, बेग, रुद्रवाड, नेरलेवाड या सर्व सहशिक्षकांनी परिश्रम घेऊन सहकार्य करून यशस्वी रितीने परिक्षा पार पाडली याबद्दल विभाग प्रमुख सौ. कुरे पाटिल मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.

0 Comments