माधव पवार
नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात असलेल्या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टॉकीचे बांधकाम अद्याप अर्धवट अवस्थेत असल्यामुळे नायगाव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या उपअभियंत्या कर्मचाऱ्यांचा बेजबाबदार पणा झाला असून सदरचे बांधकाम अनेक वर्षा पासून धुळ खात पडले असल्याने अशा अर्धवट कामामुळे नागरिकांना सदरच्या योजना अंतर्गत पाणी पुरवठा अर्धवट कामामुळे होत नसल्याने सदरील विभागाच्या अधिकाऱ्यांसह गुत्तेदाराची आणि कामाची चौकशी करण्यात यावी असे सदरील जनतेतून बोलल्या जात आहे
तालुक्यातील अनेक खेड्यापाड्यात शासनाने गावाला पाणीपुरवठा सुरळीत व्हावा नागरिकांना मुबलक पाणी मिळावे म्हणून टॉकीच्या बांधकामासह विहिरी सुद्धा मंजूर केल्या परंतु अद्याप त्या काढण्यात आलेल्या योजने अंतर्गत विहिरीला कसल्याच प्रकारे पाईप लाईन जोडण्यात आली नाही अथवा चालू करण्यात आली नसल्याने व टॉकीचे बांधकाम पूर्ण झाले नसल्याने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या हलगर्जीपणाचा कळस सदरच्या अर्धवट कामावरून दिसून येत आहे
सदरचे काम पूर्ण करून गावाला पाणी पुरवठा सुरळीत कधी होणार असाही प्रश्न जनतेला भेडसावत असून सदरचे काम गुत्तेदारा मार्फत करण्यात आले असल्याने गुत्तेदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने असे अर्धवट काम सोडण्यात आले की काय अशी ही चर्चा जोरदार चालू आहे
महाराष्ट्र शासन मोठ्या प्रमाणात अनेक योजनेच्या मार्फत तालुक्यातील बऱ्याच पैकी गावामध्ये उन्हाळ्यात कसल्याच प्रकारची पाणी टचांई निर्माण होऊ नये म्हणून प्रयत्न करीत असते अशा विविध योजना राबवत असताना सुद्धा नायगाव येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांच्याकडे डोळे झाक करत असल्याने अनेक गावात टॉक्याचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असल्याचे चित्र टॉकीचे स्पष्ट दिसून येत आहे
सध्याच्या परिस्थितीत अर्धवट असल्याने गावाला पाणीपुरवठा या टॉकी मार्फत कधी पाणी पुरवठा कधी करण्यात येणार असे ही नागरिकांतुन बोलल्या जात असून अर्धवट असलेल्या टॉकीचे बांधकाम काम तात्काळ चालू करून गावाला पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी जोर धरीत आहे

0 Comments