Header Ads Widget

खासदार राहुल गांधीच्या पदयात्रेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग नायगावात पोलीस बंदोबस्तात रस्त्यावरील अतिक्रमण हटविले

 माधव पवार / मधुकर जवळे -

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेच्या निमित्ताने अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याना गेल्या दहा ते बारा दिवसा पासून जाग आली असल्यामुळे नायगाव येथे राज्य महामार्गावर असलेल्या काही दुकाने व पान टपऱ्या व इतर साहित्य नायगावच्या पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने हाटविण्यात येत आहे
नायगावच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्याला आज पर्यंत या विभागाच्या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्यांना जाग आली नव्हती परंतु खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेच्या निमित्ताने जाग आली आहे
नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गा वरील गेल्या दहा ते १५ वर्षा पासून रस्त्याच्या अंतर्गत असलेल्या झाडाना सुद्धा जाग नव्हती की मी सरकारी आहे का खाजगी म्हणून ते काँग्रेसचे नेते खासदार राहुल यांच्या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून सदरच्या झाडाला आम्ही सरकारी असल्याची ओळख लाल पांढरा असा रंग दिल्यामुळे आम्ही खूष आहोत अशी झाडे बोलत असावे  परंतु आज पर्यंत झाडाला ही न्याय मिळाला नसल्याचे ही जनतेतुन बोलल्या जात आहेसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यानी खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने करत असलेल्या डाक डुगी व राज्य महामार्गावर करत असलेला देखावा हे अगोदर पासूनच केले असते तर आजच्या घडीला करण्याची वेळ आली नसती या एवढ्या मोठया खर्चात ग्रामीण भागातील रस्ते झकास झाले असते झाडाला रंगविने डिव्हायडरला कलर मारणे पुलांच्या भिंती रंगविणे अतिक्रमण काढणे राज्य महामार्गावर असलेली माती काढणे खड्डे बुजवणे काही ठिकाणी डांबर करणे अशा अनेक रस्त्यावर असलेल्या समस्या दूर करत असल्याचे दिसून येत आहे 

Post a Comment

0 Comments