नायगाव फास्ट न्यूज : थेट मुबंई :-
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेची मुलुखमैदान तोफ संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. राऊत गेल्या शंभर दिवसापासून आर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगत होते. मात्र आज त्यांना जामीन मिळाला आहे.
शिव सेनेची मुलुख मैदानी तोफ संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी अटक करण्यात आली होती आगोदर राऊतांना पोलिस कोठडी आणि नंतर त्यांची न्यायालयीन कोठडी झाली. तेव्हा पासून राऊत हे आर्थर रोड कारागृहामध्ये होते
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा हात असल्याचा आरोप ईडीने केला. मात्र ईडीने राऊतांवर केलेलं आरोप त्यांच्या वकिलांनी फेटाळले आहे. राऊतांचा या घोटाळ्याशी काहीच संबंध नाही असा युक्तीवाद राऊतांचे वकील करत आहेत. मात्र ईडीकडून राऊत हेच घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. सुनावणीच्या वेळी संजय राऊतांचे कुटुंब देखील कोर्टात उपस्थित होते. त्यानंतर आज संजय राऊतांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे
""”""" संजय राऊतांवरील आरोप "”""""
संजय राऊतांचे भाऊ प्रविण राऊत हे पत्राचाळ डेव्हलेपमेंटकडे लक्ष देत होते त्यावेळी त्यांना एचडीआयएल ग्रुपकडून ११२ कोटी रुपये मिळाले.
यामधील एक कोटी सहा लाख रुपये हे राऊतांच्या पत्नींच्या खात्यात पाठवण्यात आले. या पैशांमधून त्यांनी अलिबागेत जमीन खरेदी केली पत्राचाळ प्रकरणात घोटाळा केल्यामुळे राऊत कुटुंबियांना मोठा फायदा झाला असा ईडीचा आरोप आहे या पत्राचाळ डेव्हलप मेंटमध्ये प्रविण राऊत हे फक्त नावाला होते. मात्र यामागची सर्व सूत्र संजय राऊतच सांभाळत होते.

0 Comments