माधव पवार
भारत जोडो पदयात्रेत लाखोच्या संख्येने सहभाग घेऊन सोनीयाचे पुत्र खासदार राहुल गांधी यांना समर्थन द्यावे माजी आमदार पुत्र प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांचे आवाहन
या भारत भूमीवर स्वातंत्र्याच्या काळा पासून जवळ पास ३८ वर्षावर राज्य करणाऱ्या कुटूंबातील देशाचे नेतृत्व करण्यासाठी सोनियाजी राजीव गांधी यांचे सुपुत्र खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो पदयात्रेचे आयोजन केले व या पदयात्रेला अनेक राज्यातून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्यामुळे काँग्रेसचे नेते खासदार राहुल राजीव गांधी यांचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे आगमन झाले या पद यात्रेत लाखोच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन भारत जोडो पदयात्रेला समर्थन दयावे असे आवाहन माजी आमदार पुत्र प्रा. रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण यांनी केले आहे
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या वतीने काढण्यात आलेली भारत जोडो ही पदयात्रा ही इतिहास जमा होत आहे
देशात व महाराष्ट्रात येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाची सत्ता राहणार असल्याचा विश्वास नायगाव उमरी धर्माबाद तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी व्यक्त केला असून राहुलजी रूपाने काँग्रेस पक्षाला नक्कीच यश मिळणार असल्यामुळे माजी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण नेतृत्वाखाली महाराष्ट्र घडेल अशी अपेक्षा प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी व्यक्त करीत सदरच्या पद यात्रेत लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

0 Comments