Header Ads Widget

माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली खासदार राहुल गांधी यांच्या यात्रेत घुंगराळा येथील तीनशे कार्यकर्ते चालणार - सरपंच श्रीमती राधाबाई जोगेवार


     माधव पवार 
नायगाव उमरी धर्माबाद तालुक्याची माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली घुंगराळा येथून काँग्रेसचे  तीनशे कार्यकर्ते काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत चालणार असल्याच्या घुंगराळा नगरीच्या सरपंच श्रीमती राधाबाई गंगाधरराव जोगेवार यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले
आहे 

सदरच्या पद यात्रेत सहभागी होण्यासाठी घुंगराळा येथील काँग्रेसचे कार्यकर्ते सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले सदरची आदिक माहिती शोसीयल मीडियाचे नायगाव तालुका अध्यक्ष लक्ष्मण कासराळे यांनी यांनी ही माहिती दिली आहे
तालुक्यातील घुंगराळा नगरीच्या सरपंच श्रीमती राधाबाई गंगाधरराव जोगेवार यांच्यासह गावातील काँग्रेसचे अधिकारी व पद अधिकाऱ्यानी खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पद यात्रेच्या निमित्ताने तीनशे कार्यकर्त्यासह यात्रेत सहभागी होऊन राहुल गांधी यांना गावच्या वतीने समर्थन देणार आहेत

 अशा पद्धतीने आम्ही यात्रेत चालणार आहोत तालुक्यातील इतर गावातील ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खासदार राहूल गांधी यांना समर्थन देण्यासाठी सहभागी व्हावेत असे ही सरपंच श्रीमती राधाबाई जोगेवार यांनी आवाहन केले व घुंगराळा येथून एकूण तीनशे कार्यकर्ते चालणार आहेत

Post a Comment

0 Comments