नायगाव फास्ट न्यूज - थेट मुबंई :-
यामध्ये विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष यांनी गेली अनेक वर्षे राजकारणा पलीकडे जाऊन सौहार्दाचे वातावरण जपले आहे अशा मध्ये आपल्या मंत्री मंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बदल केलेले वक्तव्य अत्यंत अशोभनीय व असंस्कृत असल्यामुळे याचा तीव्र निषेध महेश तपासे यांनी केला आहे
""" कृषी मंत्री अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले """
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्तार यांच्यावर ५० खोक्या वरून टीका केली होती. त्याबाबत आज एका वृत्तवाहिनीने सत्तार यांना विचारलं असता त्यावर उत्तर देताना त्यांची जीभ घसरली इतकी भिकार झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ अशी शिवीअब्दूलगाळ त्यांनी केली सत्तार यांच्या विधानाचे जोरदार पडसाद राज्यभर उमटलं आहे त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बदल आक्षेपार्ह विधान केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी आंदोलन करत घरावर हल्ला चढवला यावेळी अब्दुल सत्तारां विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली आहे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां कडून सत्तारांच्या घरावर दगड फेक ही करण्यात आली यात त्यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण देखील उपस्थित होत्या दरम्यान अब्दुल सत्तार यांची २४ तासाच्या आत मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रातून दिला आहे

0 Comments