Header Ads Widget

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची बिलोली दौऱ्यावर जात असताना नायगावच्या तहसील कार्यालयासह पंचायत समितीला भेट - !!


      माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिनांक  २३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११ ते साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान बिलोलीच्या दौऱ्यावर जात असताना वाटेतच्या असलेल्या नायगावच्या तहसील कार्यालयासह पंचायत समितीला भेट आहे

जिल्हाधिकाऱ्यानी शेतकऱ्याच्या अनेक प्रश्नांवर व विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना ही दिल्या असून त्याच बरोबर कार्यालयातील तपासणी बाबत सूचना केल्या असल्याचे समजते आहे
नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नांदेड कडून बिलोली कडे जात असताना नायगावच्या तहसील कार्यालयास भेट दिली असल्यामुळे त्यांच्या भेटी पूर्वी अधिकाऱ्यांची मोठी धावपळ चालू असल्याचे स्पष्ट चित्र  समजते ? - 

नायगावच्या तहसील कार्यालयात भेट दिल्याच्या नंतर अभिलेख सुरक्षित पणे ठेवण्यासाठी तलाठी व मंडळाधिकारी यांना सूचना करण्यात  सध्याच्या परिस्थितीत काही दिवसातच चालू असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणुकीच्या संदर्भातील  माहिती घेतली आहे
जिल्हाधिकारी राऊत यांच्या भेटी दरम्यान गोरगरीब जनतेसह सामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्याने तात्काळ दखल घेऊन निपटारा करावा असे यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले आहे

यावेळी प्रभारी तहसीलदार श्रीकांत निळे, नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकिशोर भोसीकर, प्रभारी तहसीलदार संजय कुमार देवराये डी.डी लोंढे नायगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एल आर वांजे संजय भंडारे यांच्यासह तलाठी मंडळ अधिकारी कार्यालयीन कर्मचारी व नागरिक आणि अपंग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments