नांदेड विशेष प्रतिनिधी : एस एम मुदखेडकर :-
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा दि. ९ नोव्हेंबर रोजी नायगावला सकाळी दहा वाजताच्या येणार असल्यामुळे काँगेस पक्षाच्या वतीने प्रा.रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी जनजागृती करण्यासाठी नायगाव शहरात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली होती या रॅलीत युवकांनी उदंड प्रतिसाद देत घोषणांनी शहर दुमदुमून गेले आणि शहरात काँग्रेसचे नवचैत्यन्यमय वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रातील नांदेड जिल्यात दि ७ नोव्हेंबर रोजी देगलूर मार्ग भारत जोडो ही यात्रा नायगावात दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी नायगाव शहरात आगमन होणार आहे. भारत जोडो यात्रेच्या स्वागताची जोरदार तयारी तालुक्यातील विविध ठिकाणी करण्यात आली असून नायगाव शहरात भारत जोडो यात्रेचे जंगी स्वागत करण्यात येणार असून त्या दृष्टीने आज गुरुवारी नायगावचा आठवडी बाजार असल्यामुळे भव्य रॅली काढून शहरात भारत जोडो यात्रेची जनजागृती करण्यात आली.
प्रत्येक व्यापारी प्रतिष्ठानावर ,घरोघरी जाऊन त्यांना भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी महितीपत्र देऊन आमंत्रित करण्यात आले या रॅलीत सर्वच स्तरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन नवचैतन्य निर्माण केले.
या जनजागृती रॅलीत उपनगराध्यक्ष विजय चव्हाण, पंकज चव्हाण, नगराध्यक्ष प्रतिनिधी नारायण जाधव, सय्यद रहीम,सुधाकर शिंदे,माणिक चव्हाण, बाबासाहेब शिंदे, संजय चव्हाण, शिवाजी कल्याण , सतीश लोकमनवार, बालाजी शिंदे, सय्यद हाजीमिया, विठ्ठल बेळगे, रमेश शिंदे, गजानन कल्याण, शेख शकील, गणेशराजे नायगावकर, ,विश्वनाथ तमलूरे,पंढरीनाथ भालेराव, विजय दातात्र्यय भालेराव सुरेश जाधव, बंडू शिंदें,
पत्रकार एस.एम.मुदखेडकर,शेख माजिद, खदीर बागवान, साईनाथ चनावार,दयानंद भालेराव, सुनील सोनकांबळे, श्रीकांत भालेराव, बालाजी धोते,नरेश लांबदाडे,हणमंत बोईनवाड, सोमेश बैलके ,गजानन बादवाड,बाळू गायकवाड, बंटी शिंदे, आदींची उपस्थिती होती.

0 Comments