हिमायतनगर : नागोराव शिंदे :-
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तथा एम.आय.
डी.सी. भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक विकास संस्था असून ही संस्था राज्यात औद्योगिक विकासाची वृद्धी व्हावी या करता महाराष्ट्र शासनाने स्थापन केली असल्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यासह हदगाव तालुक्याच्या जन सामान्य माणसाला व व्यापारी वर्गाना चांगला भविष्यात फायदा होणार असल्यामुळे सदरची एम आय डी सीची लवकर निर्मिती झाली पाहिजे असे मत या विभागातील जनतेचे आहे
दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबई येथे राज्याचे उद्योग मंत्री मा.ना.उदयजी सामंत यांची बाबुरावजी कदम कोहळीकर यांनी हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात एमआयडीसी उभारण्याची मागणी निवेदनाद्वारे केली असता, मा.मंत्री महोदयांनी यावेळी लवकरच एमआयडीसी उभारण्याचे आश्वासन दिले आहे
हिमायतनगर व हादगाव तालुक्यातील व ग्रामीण विभागाच्या विकासाला चांगलीच गती मिळणार आहे
सदरच्या निर्णयामुळे हदगाव व हिमायतनगर विधानसभा मतदार संघात उद्योग उभारणीस चालना मिळणार असल्याने असंख्य तरुणांना व युवक युवतीना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार असून हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लोकनेते बाबुरावजी कदम कोहळीकर यांच्या समवेत कळमनुरी विधान सभेचे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख आ.संतोष बांगर उपस्थित होते

0 Comments