Header Ads Widget

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची सदस्य नोंदणी जोमात नायगाव तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील भिलंवडे यांची माहिती

     माधव पवार 
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची सदस्य नोंदणी नायगाव तालुक्यात अतिशय जोमाने मुसंडी मारली असल्याचे शिवसेनेचे नायगाव तालुका अध्यक्ष तथा शिवसेनेची बुलंद तोफ रवींद्र पाटील भिलवंडे नरसीकर यांनी दिनांक १६ नोव्हेंबर २०२२ रोजी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना माहिती दिली आहे
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात मजबूत करण्यासाठी पक्षाच्या आदेशानुसार सदरची सदस्य नोंदणी जोरदार चालू असल्याचे ही तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील भिलवडे यांनी सांगितले असून सदरच्या नोंदणीला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग व प्रतिसाद मिळत असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे
शिवसेना या पक्षाची बाजू अतिशय भक्कम होण्यासाठी फारसा वेळ लागत नसल्याचे ही शिवसेनेचे नायगाव तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील भिलवंडे यांनी आवर्जून सांगितले आहे

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बबन
रावजी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे नायगाव तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील भिलंवडे यांनी सदरची सदस्य नोंदणी करण्यासाठी जोरदार सुरुवात केली असल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यात नव चैतन्य निर्माण झाल्याचा उत्साह पाहूयास मिळत आहे


Post a Comment

0 Comments