माधव पवार / मधुकर जवळे :-
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार राहुलजी गांधी हे नॅशनल लेवलचे लीडर असल्यामुळे त्यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्र राज्याच्या नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यासह देगलूर तालुक्यात आणि नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या कृष्णुर एमआयडीसी येथे कॉर्नर बैठकीच्या दरम्यान घेण्यात आलेल्या जाहीर सभेला भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून प्रचंड गर्दीसह जनतेत उत्साह निर्माण झाला असल्याचे वास्तव चित्र दिसून आले आहे
भारत जोडोच्या पद यात्रे ही काँग्रेस पक्ष हा अधिकचा प्रबळ करण्यासाठी काढण्यात आली होती त्या अनुषंगाने सदरच्या पद यात्रेत खासदार राहुल जी गांधी यांना भेटण्यासाठी भेटण्यासाठी परवानगी देण्यात आली नव्हती कारण राहुलजी हे नॅशनल लेवलचे लीडर असल्यामुळे त्यांच्या सुरक्षाचा प्रश्न मोठा असल्यामुळे त्यांना काँग्रेस पक्षाच्या जेष्ठाना भेटता आले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे
भारत जोडो यात्रेच्या दरम्यान पासेच कमी असल्यामुळे कोणाला ही देता आले नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे नायगाव तालुका अध्यक्ष संभाजीराव पाटील भिलवडे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहेखासदार राहुलजी गांधी हे नॅशनल लेवलचे लीडर असल्यामुळे त्यांच्या भारत जोडो यात्रेत लाखोच्या संख्येने काँग्रेसच्या कार्यकर्त्यां बरोबर मोठया प्रमाणात जनता त्यांना समर्थन देण्यासाठी सहभागी झाली होते असे काँग्रेस पक्षाचे नायगाव तालुका अध्यक्ष संभाजीराव पाटील भिलंवडे यांनी सांगितले आहे
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची टीम अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावली असल्यामुळे अशोकराव चव्हाणसह माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी काँग्रेस कार्यकर्त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या दिलदार नेतृत्वामुळे काँग्रेस पक्षाचे नायगाव तालुका अध्यक्ष संभाजीराव पाटील भिलवंडे यांनी उत्कृष्टपणे भारत जोडो यात्रेच्या दरम्यान आपली जबाबदारी उत्कृष्ट पणे निभावली असल्याचे ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यातून बोलल्या जात आहे


0 Comments