Header Ads Widget

बरबडा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिक जयंती साजरी

बरबडा :- किरण हणमंते  :- 

बरबडा :- बरबडा येथे आद्यकवी वाल्मिक जयंती 6 नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात आली. सकाळी आद्यकवी महर्षी वाल्मिक यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले आहे. यावेळी अनेक समाज बांधवांनी  प्रतिमेला पुष्पहार घालुन त्यांना वंदन करण्यात आले. नंतर भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
वाल्मिक समाज मंदिरात  प्रसादाचे आयोजन केले आहे. सायंकाळी 5 वाजता बरबड्यातील मुख्य रस्त्याने वाल्मिकी यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत डीजे च्या तालावर तरुण ताल धरून नाचत होती.
या प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्य्क पोलिस उप निरीक्षक रमेश निखाते, जमादार लक्ष्मण सोनकांबळे आणि त्यांच्या सोबत पोलिस कर्मचारी दिगांबर शिंदे, उद्धव जाधव, पोलिस पाटिल प्रतिनिधी संजय कानगुले व सेवक खंडू मुंडफळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

या मिरवणुकीत मोठया प्रमाणात तरुण वर्ग दिसत होता तसेच सामाजिक कार्यकर्ते, राजकीय मंडळी व कर्मचारी यांची  उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments