Header Ads Widget

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोड पदयात्रेत काँग्रेस सेवा दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णकुमार पांडे हृदयविकाराने मृत्यू

       माधव पवार 
नांदेड जिल्हात एक धक्कादायक घटनाघडली असून नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असताना काँग्रेस नेत्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याची दुर्देवी घटना घडली असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातुन दुःख व्यक्त करण्यात येत असून कृष्ण कुमार पांडे असे या दुर्दैव घटनेतील नेत्याचे नाव असून कृष्ण कुमार पांडे काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत
सदरच्या माहितीनुसार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पदयात्रा नांदेड जिल्ह्यात आल्याच्या नंतर पांडे यांनी यात्रे दरम्यान झेंडा तुकडीचे संचालन केले या दरम्यान पांडे यांना श्वास घेण्याचा त्रास सुरू झाला असल्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात जाण्या पूर्वी वाटेतच पांडे यांचा मृत्यू झाला आहे
नागपुरचे कृष्ण कुमार पांडे त्यांच्या दुर्दैवी निधनामुळे काँग्रेस नेत्यांनी दु:ख व्यक्त केलं असून ज्येष्ठ नेते जयराम रमेश, दिग्विजय सिंह, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई एच के पाटील नाना पटोले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण बाळासाहेब थोरात संदेश सिंगलकर महेंद्र सिंह वोहरा यांनी दु:ख व्यक्त करत पांडे यांना श्रद्धांजली वाहली आहे 
काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यात दाखल झाली असल्यामुळे हजारो काँग्रेस कार्यकर्ते भारत जोडो यात्रेत सामील झाले आहेत  हाजारो लोकांच्या हातात क्रांतीची मशाली असून खासदार राहुल गांधी यांचे महाराष्ट्रात आगमन होताच प्रचंड फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली असून मशाल हाती घेऊन हजारो काँग्रेसचे कार्यकर्ते लोक सहभागी झाले आहेत -

Post a Comment

0 Comments