Header Ads Widget

" अंदर की बात पडली महागात " नायगाव तलाठी सज्जाचा तलाठी बालाजी राठोड अँटीकरप्शनच्या जाळ्यात - सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक बोडके यांच्या पथकाची कारवाई -


      माधव पवार 
नायगाव तहसील कार्यालयात अनेक वर्षा पासून कार्यरत असलेले नायगाव सज्जाचे तलाठी बालाजी सीताराम राठोड यांनी खरेदी केलेल्या शेत जमिनीचा सातबारा उताऱ्या वरील इतर अधिकारातील  इतरांचे नाव काढून टाकण्यासाठी तक्रार दारा कडून पैशाची मागणी केली असल्यामुळे या " अंदर की बात बाबी मध्ये सदरची बात तलाठी राठोड यांना महागात पडली असून या सापळ्यात नायगावच्या तलाठ्याला लाच लुच पत विभागाच्या अधिकाऱ्यासह त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यानी सापळा रचून राठोड अँटीकरप्शनने जाळ्यात खेचले आहे 
नायगाव सज्जाचे तलाठी बालाजी सिताराम राठोड  अँटीकरप्शनच्या जाळ्यात सापळा अधिकारी पोनि बोडके यांची कारवाई आरोपी बालाजी सिताराम राठोड,वय ४४ वर्ष पद तलाठी तलाठी सज्जा नायगाव, जि नांदेड, रा. कृष्णवाडी तांडा तालुका मुखेड जिल्हा नांदेड तक्रार प्राप्त दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ लाचेची मागणी केल्या प्रकारणी  पडताळणी करण्यात आली सदरची लाच दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ रोजी स्विकारली आहे 
सापळा कारवाई पथक अधिकारी पोलीस निरीक्षक ढवळे सपोउपनि संतोष शेट्टे पोना,राजेश राठोड, ईश्वर जाधव, यशवंत दाभनवाड,चापोना प्रकाश मामुलवार लाच लुचपत प्रतिबंधक युनिट नांदेड तपास अधिकारी गजानन बोडके 
पोलीस निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड - 

तलाठी बालाजी सीताराम राठोड यांनी  रक्कम ४०००
लाचेची मागणी केली होती आणि ती लाच त्यांनी 
स्विकारली रक्कम अंदर की बात तडजोडीर नंतर तीन हाजार ५०० तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या शेत जमिनीचे सातबारा उताऱ्यावरील इतर अधिकारातील  इतरांचे नाव काढून तक्रारदार यांचे नाव लावण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे चार हाजार रुपयाची मागणी करण्यात आली होती करून तडजोडीच्या ३ हाजार ५०० रुपये लाच स्विकारत असताना लाच लुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यानी रंगेहात पकडले आहे

Post a Comment

0 Comments