माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही दुसऱ्या मजल्यावर असल्यामुळे शेतकऱ्यांना व वयोवृद्ध शेतकरी व तरुणांना पैसे उचलण्यासाठी सतरा ते अठरा लोखंडी पायऱ्या चढून वर जावे लागत असल्यामुळे बँकेवर जाण्यासाठी वयोवृद्ध लोकांचा श्वास श्वास लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे
तालुक्यातील बरबडा येथील जिल्हा मध्यवर्ती बँक ही दुसऱ्या मजल्यावर असल्यामुळे सदरच्या बँक शाखा अधिकाऱ्यानी वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी अनुदान व पिक विमा देण्यासाठी खाली व्यवस्था करावी असे जन सामान्य वयोवृद्ध शेतकऱ्यातून मागणी होत आहे
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी तालुक्यातील बरबडा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यंत्रणे कडे लक्ष देऊन सदरच्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक व्यवहार करण्यासाठी वरच्या मजल्यावर न जाता वय वृद्ध शेतकऱ्यांना अनुदान पीक विमा खाली वाटप करण्याच्या सूचना देतील का ? असा प्रश्न चर्चेला जात आहे
सदरची सहकारी बँक ही बस स्टँड जवळ असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने शासकीय अनुदान व पिक विमा त्याच बरोबर कर्ज भरणे व उचलण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेवर जावे आहे
वयोवृद्ध शेतकऱ्याना जीव मुठीत धरून वर खाली जावे लागते आणि उतरावे लागते सदरची व्यवस्था सरळ आणि सोपी केली तर शेतकऱ्यांना सहज रीत्या आर्थिक व्यवहार करता येतो असे ही जनसामान्य माणसातून बोलल्या जात आहे

0 Comments