Header Ads Widget

माळइकळी येथील लोकांचे उपोषण पे उपोषण शासकीय गायरान जमिनीवरिल अतिक्रमण हाटविण्यात यावे -जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण -


      माधव पवार
माळइकळी येथील लोकांचे उपोषण पे उपोषण शासकीय गायरान जमिनीवरिल अतिक्रमण हाटविण्यात यावे - जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येत आहे 

नायगाव तालुक्यातील मौजे माळइकळी येथील लोकां कडून उपोषण पे उपोषण करण्यात येत असून एका गटा कडून ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या कामाची चौकशी करण्यात यावे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात आले त्या पाठोपाठ आता ग्रामपंचायत कार्यालयाच्या मार्फत येथील शासकीय गायरान जमीनी वरील अतिक्रमण काढण्यात यावे म्हणून दिनांक २१ नोव्हेंबर २०२२ रोजी पासून नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर अमरण उपोषण करण्यात येत आहेतालुक्यातील मौजे माळइकळी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या विकास कामाला एकी कडे गाल बोट लागत असले तरी दुसऱ्या बाजूने शासकीय जागेत असलेल्या अतिक्रम काढण्यासाठी  ग्रामपंचायत कार्यालय तटस्त भूमिका घेतली असून प्रशासनाने यावंर लवकर ऍक्शन घेऊन सदरचा विषय मार्गी लावावा असे सध्याच्या परिस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करणाऱ्या उपोषण कर्त्यांचे म्हणे आहे
महिला ग्रामसेवक सौ विद्याताई पाटील मोरे म्हणतात विकास कामे करण्यासाठी होतोय अडतळा !!

गायरान जमिनीत गावकऱ्यानी केलेले अतिक्रमण एकूण ८९ लोकांनी केले होते परंतु त्यापैकी ७० लोकांनी अतिक्रमण हटविले असल्याची माहिती ग्रामसेवक विद्याताई मोरे यांनी दिली असून उर्वरित अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाला पोलीस बंदोबस्त लागतो परंतु पुरेसा बंदोबस्त नसल्यामुळे अतिक्रमण हटविणे शक्य होत नसल्याने अतिक्रमण राहत आहे यासंदर्भात गावच्या विकासात मोठी खीळ बसत असून सदरचे अतिक्रमण आणि गावातील राजकारणामुळे येथील महिला ग्रामसेवकाच्या डोक्याला कटकट झाल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 
-------------------------------------------------------------------
शासकीय गायरान जमिनीवरिल अतिक्रमणे हटविण्यात यावे म्हणून उपोषण कर्ते उपसरपंच प्रतिनिधी शंकर गिरी, सुगंध पुयड, बळीराम जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर अमरण उपोणास बसले आहेत
--------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments