Header Ads Widget

राजकारणात नव तरुणाची फळी निर्माण झाली तर भारतीय राज्य घटनेचा सन्मान होतो - श्रीहरी देशमुख नरंगलकर !!


    
     माधव पवार 
सध्याचे युग हे कॉम्प्युटरचे युग असल्यामुळे देशाची मोठ्या प्रमाणात प्रगृती होत असताना सध्याची परिस्थिती पाहिली तर राजकारणातील चित्र मोठ्या प्रमाणात खालच्या थरावर आल्यामुळे जनसामान्य कार्यकर्त्यांना कुठे ही मानाचे स्थान मिळत नसल्यामुळे राजकारणात नव तरणाची फळी चांगल्या प्रकारे निर्माण झाल्यास खरोखरच भारतीय राज्य घटनेचा सन्मान होईल असे भाजपाची नवीन तडफदार तोफ श्रीहरी देशमुख नरंगलकर यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे
राजकारणातले वास्तव चित्र पाहिले तर मंत्र्याचा मुलगा मंत्रीच होणार खासदाराचा मुलगा खासदारच होणार आमदाराचा मुलगा आमदारच होणार सरपंचाचा मुलगा सरपंच होणार गेल्या अनेक वर्षा पासून विविध पक्षात काम करणारा निष्ठावंत जनसामान्य कार्यकर्ता यांना कधी न्याय मिळणार अशी खंत भाजपाचे श्रीहरी देशमुख यांनी व्यक्त केले असून नव तरुणानी  राज्याच्या हितासाठी व विकासासाठी आपले अस्तित्व निर्माण करण्याची गरज असल्याचे देशमुख म्हणाले आहे
सध्याच्या परिस्थितीतील राजकारणातील बिकट अवस्था पाहून जनसामाने कार्यकर्ता ही हैरान होत असल्याचे वास्तव चित्र स्पष्ट दिसत असून येत असून नवतरुण वर्गाने राजकारणात चांगल्या प्रकारे एन्ट्री केली तर नक्कीच राज्य घटनेचा सन्मान झाल्या शिवाय राहत नाही असे ही श्रीहरी देशमुख म्हणाले आहे

महाराष्ट्रात प्रस्थापिताचे राजकारण झाले असल्यामुळे
विस्थापित संपवु शकतो प्रस्थापिताना असे ते म्हणाले आणि राजकारणात चांगली मुले आली तरच भारतीय संविधानाचा सन्मान होईल असे बोलताना सांगितले आहे 

 


 

Post a Comment

0 Comments