माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे आंतरगाव येथे ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे वारे गेल्या दोन ते तीन महिन्या पासून गावांतर्गत वाहत असल्यामुळे या गावातील निवडणूक अटीतटीची होणार असली या ग्रामपंचायतच्या निवडणूकीत विरोधकाची ताकद आजमावणार आणि निवडणूकी रिंगणात दंड ही मारणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते बाबुराव तोडे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना दिनांक १४ नोव्हेंबर २०२० रोजी सांगितले आहेतालुक्यातील आंतरगाव वासियासाठी मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून गेल्या अनेक वर्षा पासून सामाजिक कार्य करीत असतो गावाला बस चालू करण्यात यावी म्हणून अनेक वेळा प्रयत्न केला आहे
आणि बस गावात आणून दाखविली अशा कोणत्याही समस्यावर मात करण्यासाठी माझा विशेष सहभाग असतो योगा योगाने आंतरगावच्या ग्रामपंचायतची निवडणूक येत्या डिसेंबर महिन्यात पार पडत असल्यामुळे थेट जनतेतून सरपंच पदाची नेमणूक असल्यामुळे सरपंच पदाचा दावेदार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहेआंतरगावांतील विकासाचे प्रश्न नाल्या पाणी लाईट नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी माझा प्रयत्न असणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते बाबुराव तोडे यांनी सांगितले गावच्या विकासा बरोबर अनेक समस्या गावात भेडसावत असल्यामुळे ते समस्या दूर करण्यासाठी माझी उमेदवारी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत राहणार आहे
गावातील नगरींकाचे सहकार्य असल्यामुळेच मी सदरच्या निवडणुकीत कंबर कसणार असल्याचे बाबुराव तोडे यांनी सांगितले आहे
निवडणुकीची रणधुमाळी पार पडणार आहे.दिनांक १८ नोव्हेंबरला संबंधित तालुक्यातील तहसीलदार निवडणुकीची नोटीस जारी करतील दिनांक १८ डिसेंबरला मतदान होणार असून २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे

0 Comments