Header Ads Widget

महात्मा फुले शाळा बाबानगर नांदेड येथील विद्यार्थिनी कुमारी रोशनी किरण हनमंते हिचे पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश !!



बरबडा :- किरण हणमंते - 

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२१-२०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. महात्मा फुले बाबा नगर नांदेड शाळेतील विद्यार्थीनी कु. रोशनी किरण हनमंते हीने शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे

रोशनी हनमंते  हि रोशनी कंप्युटर एज्युकेशन बरबडा तथा देशोन्नती चे पत्रकार किरण हनमंते यांची ती कन्या असल्याने सर्व पत्रकार बांधव व मित्रमंडळी यांच्यातूनही कौतुक व अभिनंदन केले जात आहे
तसेच या तिच्या या यशाबद्दल कु. रोशनी हनमंते तीचे आजी - आजोबा, आई - वडील, काका व सर्व नातेवाईक आणि तसेच महात्मा शाळेतील शाळेतील मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षक, शिक्षिका व यांच्या सह वर्ग मैत्रीणी यांनी अभिनंदन केले आहे
सध्या ६ वी वर्गात शिकत असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यालयातील संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य दिलिपराव धर्माधिकारी, शाळेचे सर्व संचालक मंडळ, शाळेचे उपमुख्याध्यापक जी. पी. बडूरे ,पर्यवेक्षक एस. एन. फड ,ज्युनियर कॉलेजचे पर्यवेक्षक शिंदे ,प्रा. सुदर्शन धर्माधिकारी, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख रणजित भुसावळे, माधव कंडापल्ले, एन. एम. तिप्पलवाड , संतोष पचलिंग, अशोक बक्केवाड, प्रा.वाघमारे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचारी यांनी वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments