माधव पवार
भारत देश एकीकडे महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत असताना याच देशात व ग्रामीण भागात गोरगरीब लोकांना पोटाची खळगी भरण्यासाठी अखेरचा पर्याय म्हणून पाषाणातील दगड फोडून उदरनिर्वाह करण्यासाठी रक्ताचे पाणी करावे लागत असल्याचे ज्वलंत उदाहरण ग्रामीण भागात दिसून येत आहे
शासन एकीकडे रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करते आणि दुसरी कडे ग्रामीण भागातील मजुराच्या हाताला काम मिळत नाही रोजगार हमी योजनेच्या कामातून मिळणारा पैसा गोरगरिबाच्या हितासाठी मिळत नसल्यामुळे छोटे छोटे लेकरं घेऊन महिला व पुरुष मंडळी हातोड्याच्या साह्याने पाषाणातील दगड फोडून पोटाची खळगी भरत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
सध्याच्या परिस्थितीत राज्याचे राजकारण विचेंबलित झाल्यामुळे गोरगरीब जनतेच्या हाताला काम नसून पोटाची खळगी भरण्यासाठी गोरगरीब नागरिकांना व कुटुंबाला दररोजचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी कुठे ना कुठे काम लागावे म्हणून दाही दिशा फिरावे लागते अशातच काही गरीब कुटुंबे पोटाची खळगी भरण्यासाठी पाषाणातील दगड फोडून आपल्या छोट्या छोट्या बाळांचे जीवन जगवित आहेतमहाराष्ट्र शासन एकीकडे विध्यार्थाच्या शिक्षणावर मोठा खर्च करीत असतो दुसरी कडे या घटकातील मुले शिक्षणा पासून वंचित राहत असल्यामुळे सदरची गंभीर बाब समोर येताना दिसून येत असून पाषाणाला पाझंर फुटेल परंतु प्रशासनाला पाझंर फूटणार नाही असे ही जनतेतून बोलल्या जात असून ग्रामीण भागात पोटाची खळगी भरण्यासाठी पाषाणातील दगड फोडून गरिबाला रक्ताचे पाणी करावे लागत आहे

0 Comments