Header Ads Widget

राज्याचे ग्रामविकासमंत्री ना. गिरीश महाजन यांना निवेदन

      किरण हणमंते 
राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री ना.गिरीश महाजन नांदेड याठिकाणी आले असताना  त्यावेळी निवेदन देताना बरबड्याचे विद्यमान सरपंच माधव कोलगाणे व जवाहरलाल नेहरू शिक्षण समिती चे अध्यक्ष तथा भाजपा चे नेते दिलिपरावजी धर्माधिकारी बरबडेकर यांनी या भेटीत त्यांचा सत्कार करण्यात आला आहे

नायगाव तालुक्यातील बरबडा गावच्या विकासासाठी एक कोटी ची मागणी करण्यात आली. यावेळी नांदेड चे खासदार प्रतापराव पाटिल चिखलीकर यांची उपस्थिती होती. ना. गिरीश महाजन यांच्याशी बरबडा गावच्या संदर्भात विकासात्मक चर्चा केल्याचे सांगण्यात आले. पालकमंत्र्यांना प्रथमच निवेदन देऊन त्यांना निधी देण्यासाठी पाठपुरावा करत असल्याची माहिती सांगण्यात आली. अनेक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments