Header Ads Widget

मराठवाडा महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ नावंदी द्वारा संचलित प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा भोकर येथे महार्षि वाल्मिकी यांच्यासह बिरसा मुंडा यांचा फोटो लावण्यासाठी यंत्रनेला ऍलर्जी का ? - जिल्हाधिकाऱ्याना भेटून निवेदन देणार - विजय कुमार पाटील मोरे

भोकर : विजय कुमार पाटील मोरे 

मराठवाडा महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ नावंदी द्वारा संचलित प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा भोकर येथील आश्रम शाळेत वर्षी वाल्मिकी ऋषी यांच्यासह बिरसा मुंडा या महापुरुषांच्या फोटो सदरच्या शाळेत लावल्या नसल्यामुळे सदरेल यंत्रणेचा अजेब कारभार समोर आला असून सदरच्या यंत्रणेला महापुरुषाचे फोटो लावण्यासाठी एलर्जी का ?  असा प्रश्न जनसामान्य माणसातून विचारला जात आहे
नांदेडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची या संदर्भात भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे काँग्रेस प्रेणित राष्ट्रीय काँग्रेस परिवार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदिवासी विकास संघटना महाराष्ट्र प्रदेश महासचिव रूग्ण हक्क संरक्षण समिती नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष
विजय कुमार पाटील मोरे यांनी नायगाव फास्ट न्यूजची बोलताना सांगितले आहे
मराठवाडा महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ नावंदी द्वारा संचलित प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा भोकर या शाळेत सर्व महापुरुषांचे फोटो लावणे आवश्यक असताना सुद्धा या शाळेत ज्यांनी रामायाणाची रचना केली अशा महर्षी वाल्मिकी ऋषी यांचा फोटो व बिरसा मुंडा या महापुरुषाचे फोटो का ?  लावण्यात आले नाही जर काढून ठेवले असतील तर ती कधी लावणार असा प्रश्न विजयकुमार पाटील मोरे यांनी प्रश्न उपस्थित केला आहेया सर्व शाळेत महापुरुषाचे फोटो लावलेले असून महर्षी वाल्मिकी ऋषी व बिरसा मुंडा यांचे फोटो नसल्याने आश्रम शाळेच्या यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केला जात असून सदरची आश्रम शाळा ही मराठवाडा महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ नावंदी द्वारा संचलित प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा भोकर महापुरुषांच्या नावाने असताना सुद्धा याच शाळेत दोन महापुरुषांचे फोटो नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments