Header Ads Widget

शेतकऱ्यांनी दुधाळ जनावराकडे वळावे शिवाजी माने यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन



 
हिमायतनगर प्रतिनिधी :- नागोराव शिंदे -

हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथे गेल्या सहा वर्षापासून एका संस्थेमार्फत दूध डेरी चालवल्या जाते त्या दूध डेरी वर गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपले दूध त्या संस्थेला दिल्याने संस्थेमार्फत दूध उत्पादक शेतकऱ्यांना बोनस म्हणून वाटप करण्यात आले आहे
दुधाळ जनावरे गट वाटप योजना ही जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागा मार्फत अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी राबविली जाते या योजनें तर्गत ७५ टक्के अनुदानावर दोन दुधाळ जनावरे गट वाटप केले जातात दोन जनावरांमुळे कुटुंबाला नियमित उत्पन्नाची सोय होते हे विशेष असले तरी ग्रामीण भागातील लोकांना या योजने अंतर्गत लाभ मिळत नाही ते लाभ मिळाला पाहिजे अनेकाचा हेतू आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चंद्रावर दुकानदार प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीराव माने, प्रदिप पाटील, तानाजी देवसरकर , प्रदिप शिरफुले बाबुराव जाधव शिरपलि , अवधुत कदम डोलारि प्रल्हाद वानखेडे यांच्यासह गावातील सर्व शेतकरी दुध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि यावेळी शेतकऱ्यांनी दुधाळ जनावराकडे वळावे शिवाजी माने यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आवाहन केले आहे 

Post a Comment

0 Comments