राजकीय पुढाऱ्याच्या नावाखाली उमरी तालुक्यातुन नायगाव तालुक्यासह अन्य तालुक्यात रात्री बेरात्रीच्या वेळात अवैध रेतीची वाहतूक होत असताना सुद्धा दोन्ही तालुक्याचे महसूल प्रशासन करतात तर काय असा प्रश्न चर्चेला जातं असून नायगाव तालुक्यात रात्रीचा केला जाणारा गोदावरी पात्रातील अवैध रेतीचा उपसा बंद असल्यामुळे उमरी तालुक्यातुन अवैध रेतीची येते तरी कुठून ? असा प्रश्न समोर येत असल्यामुळे रात्रीची अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची चर्चा होताना दिसत आहे
प्रशासनाने रेती घाट गेल्या वर्षा पासून बंद केले असताना सुद्धा पाण्यातून काढलेली रेती येते तरी कुठून असा प्रश्न चर्चेला जात असला तरी संबंधित विभागाचे अधिकारी डोळे झाक का ? करीत आहेत अशी चर्चा होताना ऐकावयास मिळत असली तरी काही राजकीय पुढार्यांच्या नावाखाली रात्री बे रात्री बळेगाव ते कुंटूर मार्गे रेती जात असल्याचे सांगण्यात येत असून अशा ह्या गंभीर बाबीकडे उमरीच्या तहसील महसूल शासनाने आणि नायगावच्या तहसील प्रशासनाने रात्रीचे पथक तयार करून अवैध मार्गे जाणाऱ्या रेतीला आळा बसावे अशी मागणी जनतेतून होत आहे

0 Comments