माधव पवार
नांदेड जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार नांदेड पोलीस अतिशय सक्षम कर्तव्य बाजवत असल्यामुळे विविध गुन्ह्यांतील गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यासाठी धरपड करीत असल्यामुळे अनेक गुन्हेगार जेरबंद होताना पाहवयास मिळत असून असच प्रकार शहरात व जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगाराचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात कारवाईचे बंड पुकारल्यामुळे त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना सूचना दिल्या आहे
त्या नुसार सक्षम पोलीस पथक तयार करून दिनांक ३१ऑक्टोबर २०२२ रोजी पोलीस निरीक्षक चिखलीकर यांना शहरातील तानाजी नगर येथे दोन तरुणांकडे अवैध गावठी पिस्टल बाळगत असल्याची माहिती मिळाल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्याना सदरची बाब सांगितले व वरिष्ठा आदेशाचे पालन करीत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अमलदार यांनी तानाजी नगर येथे रवाना झाले आहे
स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकाऱ्यानी सदरच्या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या सदरचे २ गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस यांची अंदाजी किमत चाळीस हाजार ८०० रुपये दोन पंचा समक्ष जप्त करून सहाय्यक पोलीस निरीक्षक पि व्ही माने यांच्या फिर्यादी वरून विमान तळ पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
नांदेडचे स्थानिक गुन्हे शाखेचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपल्या पथकातील अधिकारी पोलीस कर्मचारी व अमलदार यांनी आकाश लुळे यांच्या घरा समोरील असलेल्या रोडवर तानाजी नगर नांदेड शहरात जाऊन आरोपी आकाश गोविंदराव लुळे वय वर्ष वीस व्यवसाय बेरोजगार राहणार तानाजीनगर नांदेड व राम व्यंकटी पल्लेवाड वय २५ वर्ष व्यवसाय बेरोजगार राहणार देगांव तालुका नायगाव जिल्हा नांदेड यांना पकडून त्यांची झाडा झडती घेतली असता त्यांच्या कमरेला लावलेले एक गावठी पिस्टल व जिवंत काडतुस स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यानी जप्त केले आहे

0 Comments