Header Ads Widget

ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेचा बोजवारा ग्रामपंचायत कार्यालयात लाभार्थ्यांना सरपंच व ग्रामसेवका कडून घरकुले आल्याच्या सूचना ? मात्र एक ही घरकुल मिळेना !!



       माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील व ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेचा नुसता बोजवारा झाला असून सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामसभेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना घरकुले आल्याची माहिती दिली असली तरी प्रत्यक्षात एक ही घरकुल पंतप्रधान आवास योजनेची चालू नसल्याने सदरची योजना ही बारगळली की काय असा प्रश्न जनसामाने माणसासह लाभार्थ्यात निर्माण झाला असून अद्याप तरी सदरच्या योजनेचे घरकुले मिळाले नाहीत आणि त्यांचे काम ही ग्रामीण भागात चालू नाहीत ही कसली योजना असे ही जनतेतून बोलल्या जात आहेनायगाव तालुक्यासह खेड्यापाड्यात पात्र लाभार्थी घरकुलाच्या योजने पासून वंचित असल्यामुळे आज ही गरीब दारिद्र रेषेखालील कुटुंबे टीना पत्रे टाकून संसार करीत असून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी झोपडी मुक्त करण्याचा संकल्प केला परंतु सदरचा संकल्प ग्रामीण भागात वरचेवर फोल ठरत असल्याचे दिसून येत असून गोरगरीब पात्र लाभार्थी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुलाच्या प्रत्यक्षात असल्याचे दिसून येत असले तरी पंतप्रधान आवास योजनेचा सदर ग्रामीण भागात लाभ मिळाला नसल्याने पात्र लाभार्थी सदरच्या योजने पासून वंचित असल्याचे ही दिसून येत आहेत सन २०१० मध्ये इंदिरा गांधी आवास योजना व रमाई योजनेचे कामे मोठ्या प्रमाणात चालू होते परंतु या ही योजने अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुले मिळत नसल्याने पात्र लाभार्थ्यांत संतापाची लाट पसरली असून या संदर्भात पंचायत समितीने व शासनाने गांभीर्याने लक्ष घालून गोरगरीब दारिद्र रेषेखालील पात्र लाभार्थ्यांना घरकुलाची मंजुरी देऊन हक्काचे घर बांधण्यासाठी जास्तीत जास्त घरकुले मंजूर करावेत अशी मागणी जनसामान्य माणसासह लाभार्थ्यातून करण्यात येत असून सध्याच्या परिस्थितीतील वास्तव चित्रे पाहिले तर दुष्काळ फिटेना घरकुले मिळेना अशी गत निर्माण झाल्याचे ही दिसून येत आहे

Post a Comment

0 Comments