Header Ads Widget

नायगाव तालुक्यातील आंतरगावातील निवडणूक होणार चूरशीची २८ नोव्हेंबर पासुन नामनिदर्शन जारी !!

बरबडा :- किरण हणमंते  :- 

सध्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम  २०२२ च्या  निवडणुका जाहिर झाल्या आहेत नायगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायत चा कार्यक्रम लागला आहे. मागील ग्रामपंचायत चा कालावधी ऑक्टोबर महिन्यात संपुष्टात आला असल्यामुळे हा कार्यक्रम लावण्यात आला आहे. या  निवडणुका काही कारणास्तव लांबणीवर पडल्या होत्या त्या आता या निवडणुका डिसेंबर महिन्यात होणार असुन १८  डिसेंबर रोजी मतदान व वीस डिसेंबरला मतमोजणी आहेयासाठी निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे  नायगाव चे तहसीलदार गजानन शिंदे यांनी सांगितले आहे
नायगाव तहसीलने नोटीस प्रसिद्ध १८ नोव्हेंबर रोजी करून नाम निदेर्शन मागवण्याचा व दाखल करण्याचा कालावधी २८ नोव्हेंबर पासून २ डिसेंबर पर्यंत आहे.५ डिसेंबर रोजी अर्जाची छननी होणार असुन ७ डिसेंबर रोजी माघार घेण्यासाठी ची मुदत त्या दिवशी ३ पर्यंत वेळ असुन ३ च्या नंतर  चिन्हे वाटप करण्यात येणार आहे

त्याच दिवशी यादी अंतिम उमेदवाराची यादी प्रसिद्ध करून चिन्हे वाटप केल्या जाणार आहे. मग रणधुमाळी ला सुरवात होऊन सर्व उमेदवारांचे भवितव्य 18 डिसेंबर ला मतपेटीत बंद होऊन वीस डिसेंबरला उमेदवार यांचे नशीब खुलणार आहे
या पंचायतीचा कार्यकाळ ऑक्टोबर महिन्यात संपला असुन आरक्षण जाहिर होताच एकेकाळी मित्र असणारे आणि उपसरपंच पद भोगल्यावर त्यांनी आता एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून मैदानात उतरले आहेत. तेव्हापासून मतदारांना आपलेसे करून घेण्यासाठी दोघेही शर्यतीचे प्रयन्त करत  असल्याची चर्चा आहे

बरबडा सर्कल मधील आंतरगावातील निवडणूक चूरशीची होत असल्यामुळे यात आजी व माजी आमदार आपली प्रतिष्ठा पणाला लावतील का? हा उत्सुकतेचा विषय असुन नायगाव तालुक्याचे लक्ष या गावाकडे लागले आहे. याची जोरदार चर्चा नागरिकांतून होताना दिसत आहेप्रथमच या निवडणुका मध्ये सरपंच पद हे जनतेतुन असल्यामुळे जनता कोणाच्या गळ्यात विजयाची माळ टाकेल सांगता येत नाही. नायगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायत ची निवडणूक होणार आहे तरी यात काही ग्रामपंचायत बिनविरोध निघण्याच्या मार्गांवर आहेत. तर काही अटी- तटीत होणार असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.

या निवडणुकीत सरपंच पदाचे प्रमुख दावेदार म्हणुन गजानन शिंदे आणि संभाजी शिंदे हे दोन्हीही तरुण उमेदवार एकमेकांच्या विरोधात सरपंच पदासाठी रस्सीखेच असल्याची गावकऱ्यातून सांगण्यात येत आहे. हि ग्रामपंचायत नऊ सदस्यांची असुन त्यात तीनच वार्ड आहेत. सरपंचांची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे येणारा काळच ठरवेल याची उत्सुकता लागली आहे.


Post a Comment

0 Comments