माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील दमदार तोफ असलेले व गेल्या दहा वर्षापासून जिल्हा परिषद सदस्य म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे काम करणारे व राष्ट्रीय समाजवादी पक्षाचा माध्यमातून सरचिटणीस म्हणून कामे केलेले दशरथ लोहबंदे यांच्या नेतृत्वाखाली नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काही वर्षाखाली लाखोच्या संख्येने विराट मोर्चा काढला होता
त्या विराट मोर्चाने जिल्हा प्रशासन चांगलेच हादरले होते अशा दमदार नेत्याची महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने सर्वत्र जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे
नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यात व येथील रहिवासी असलेले मा. जिल्हा परिषद सदस्य दसरथ लोहबंदे यांनी राज्यात होत असलेला राजकीय डावपेच लक्षात घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचे मान्य करून सदरची शिवसेना बळकट व दणकट करण्यासाठी लोहबंदे आणि प्रवेश केला आहे
सदरच्या प्रवेशाने त्यांच्या चाहात्यातून व त्यांच्या कार्यकर्त्यातून व शिवसेनेच्या कार्यकर्त्या कडून लोहबदे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जे राजकीय सूडबुद्धीने त्रास केला जात असल्यामुळे ते पाहावे असे वाटत नसल्याने मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले आहे

0 Comments