Header Ads Widget

नायगाव तालुक्यातील सातत्याने पाऊस पडत असल्याने शेतकरी वैतागला सोयाबीन काढनीला आलेला वेग परत खोंळबला -


      मधुकर जवळे 
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नाही शासनाचे अनुदान मिळेना नाही विमा मिळेना अधून मधून सातत्याने पडत असलेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचा बट्याबोळ झाला आणि नायगाव तालुक्यातील व ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा शेतात उरले सुरले सोयाबीन काढनीसाठी गेल्या चार दिवसा पासून वेग चढला होता परंतु सातत्याने पडत असलेल्या पावसाने नुकसानीवर नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे
नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय गंबीर पावसामुळे बनली असताना ही शासकीय अनुदान काय करता शेतकऱ्यांना मिळत नाही पीक विमा सुद्धा मिळत नाही विमा कंपनीवाले तर सर्व पिके नस्ट झाल्याच्या नंतर पंचनामे करण्यासाठी गावा गावात फिरत आहेत
आता कधी  पंचनामे करतील आणि शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळेल असा प्रश्न शेतकऱ्यातुन उपस्थित केला जात असून शेतकऱ्यांवर अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाल्याचे शेतकरी गटातून बोलल्या जात आहे

शासनाची शेतकऱ्यांना आलेली तूटपुंजी मदत तात्काळ बँकेच्या शाखाधिकाऱ्यानी खात्यात जमा करावी अशी मागणी केली जातं आहे नायगाव तालुक्यातील सातत्याने पाऊस पडत असल्याने शेतकरी वैतागला सोयाबीन काढनीला आलेला वेग परत खोंळबला आहे 

Post a Comment

0 Comments