हिमायतनगर : नागोराव शिंदे :-
तालुक्यातील पळसपुर येथे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी एका पिसाळलेल्या कोल्ह्याने गावातील लाहान मोठ्या जनावारांना चावा घेतला होता त्यातच पळसपुर येथील शेतकरी बाबुराव शिरफुले यांच्या शेतातील आखाड्यावर बांधुन असलेल्या बैलाला कोल्ह्याने चावा घेतल्याने त्यात लाल रंगाच्या बैलाचा मृत्यू झाल्यामुळे शेतकऱ्यांचे ५५ हजार रुपयाचे नुकसान झाले असल्यामुळे वन विभागाने सदरची भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे
हिमायतनगर तालुक्यासह खेड्यापाड्यातील असलेल्या पळसपुर येथील परिसरात पिसाळलेल्या कोल्याचा वावर झाला असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगायला लागली असून अशा ह्या बाबीकडे वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पिसाळलेल्या कोल्याचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी सुज्ञान नागरीकातून होत असताना दिसून येत आहे
तालुक्यातील पळसपुर येथील शेत शिवारात कामे करण्यासाठी पुरुषमंडळी सह महिला वर्ग मोठ्या प्रमाणात शेतात जात असतात परंतु काही पिसाळलेल्या कोल्याचा धुमाकूळ माजला असल्याची चर्चा होत असली तरी यांना पाव बंद करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकार्यासह वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ सदरच्या कोल्यांचा पुढील जनावराचे बळी टाळण्यासाठी बंदोबस्त करावा जेणेकरून कोणत्याही माणसावर त्यांचा हल्ला होऊ नये याची दक्षता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे
पिसाळलेला कोल्हा चावा घेतलेल्या बैलाचा पंचनामा वनपरिक्षेत्र कार्यालय हिमायतनगर वनपाल विभुते मॅडम सातशे यांनी पंचनामा करून वरिष्ठांना माहिती कळवली आहे अधिकारी सोनटक्के यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या बैलाचा मृत्यू झाल्याच्या घटनास्थळी पाहणी केली
या विभागात जनावरांसह शेळ्या मेंढ्या मोठ्या प्रमाणात चारण्यासाठी जातात यांच्यावरही पिसाळलेल्या कोल्याचा हल्ला होऊ नये म्हणून मागणी केली जात आहे

0 Comments