माधव पवार
राज्यात जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान झाली असताना विमा कंपनीला सर्व नास झाल्यावर ऑक्टोबर महिन्यात जाग आली आणि पंचनामे करण्यासाठी सुरुवात केली शेतकऱ्यांनी शेतातील थोडेफार पिकलेले सोयाबीन काढणीला सुरुवात करून सोयाबीन घरात येऊन पडत असताना विमा कंपनीच्या अजेब कारभारामुळे आता शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करत आहेत शेतात काळे रान काड्डाचा पंचनामा हे कसे शक्य ? असा प्रश्न निर्माण झाला आहे
राज्यासह जिल्ह्यात दिनांक ७ जुलै १५ जुलै आणि २५ जुलैच्या दरम्यान आणि ऑगस्ट महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वाहून गेले जमिनी खरडू गेल्या असताना ही विमा कंपनीच्या धोरणा नुसार शेतकऱ्यानी कंपनीकडे मोठया प्रमाणात विमा भरला असल्यामुळे सदरच्या नुकसान भरपाई संदर्भात अनेकानी जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांच्या तात्काळ विमा मंजूर करण्यात यावा म्हणून निवेदन देण्यात आले असताना ही विमा कंपनी कडून आर्थिक लूट पंचनाम्याची नावाखाली होत असल्याचे दिसून येत आहे
विमा कंपनीकडे किती टक्के शेतकऱ्यांनी नुकसान झाली म्हणून तक्रारी केल्या आहेत यांचा ही अंदाज शासनाला लागत नसल्यामुळे विमा कंपनी कडून करण्यात येत असलेले पंचनामे हे अधिकृत विमा कंपनी धारणार का ? ज्या शेतकऱ्यानी कंपनी कडे तक्रार केली नाही त्यांचे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात असला तरी आता पंचनामे करण्या मागचे गोडबंगाल काय असा ही प्रश्न केला जात असून या बाबीकडे जिल्ह्याधिकाऱ्यासह संबंधित तहसीलदारानी लक्ष घातले तर नेमके काय प्रकार आहेत सरळ सरळ समोर येणार असल्यामुळे शेतात पीकच नाही तर पंचनामे कशाचे असा प्रश्न ? केला जात आहे

0 Comments