Header Ads Widget

शेतकऱ्यानी ऊसाची जास्तीची लागवड करून कुंटूरकर शुगर कारखान्याला द्यावे - आंबादासराव धर्माधिकारी

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कुंटूरकर शुगर कारखान्याचे कार्यक्षत्र मोठे असल्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीची ऊसाची लागवड करून कारखान्याला ऊस दयावेत असे प्रतिपादन माजी मंत्री स्वा. गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे जावई आंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी बरबडेकर यांनी कारखान्याच्या बॉयलयर पूजनाच्या कार्यक्रमात केले ते पुढे म्हणाले की या भागातील शेतकरी सक्षम असल्यामुळे ऊसाची मोठया प्रमाणात लागवड करणे गरजेचे आहे

कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार प्रताप चिखलीकर यांच्यासह व्यापीठावर राजेश देशमुख कुंटूरकर, बाळासाहेब उर्फ आंबादासराव धर्माधिकारी बरबडेकर , भाऊसाहेब देशमुख गोरठेकर, बालासाहेब पाटील खतगावकर, बाबासाहेब हंबर्डे हुस्सेकर रमेश  पारसेवार, शिरीष भाऊ देशमुख गोरठेकर, परबता पाटील जाधव, जाफ्रूदिन साहेब, कुंटूर पोलीस ठाण्याचे फौजदार दिनेश येवले, व्यंकटराव मोकले, दिलीप महोनराव सुगांवकर, आदी यावेळी उपस्थित होते 

तालुक्यातील कुंटूरकर शुगर कारखाना हा माजी मंत्री स्वा. गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी व ऊस लागवडीच्या माध्यमातून त्यांचे उत्पन्न वाढावे आणि शेतकरी या विभागातील सक्षम झाला पाहिजे व रोजगाराना रोजगार मिळाला पाहिजे हा डोळस विचाराने सदरच्या कारखान्याची निर्मिती केली आणि कारखाना ही चांगल्या प्रकारे चालत असल्यामुळे शेतकऱ्यानी ऊसाची लागवड करावी असे ही आंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी यांनी आयोजित कार्यक्रमात मत व्यक्त केले आहे

राजेश्वर वंगलवार,राम चिद्रावार, विक्रम देशमुख, हणमंतराव कोळगावकर, प्रल्हाद पाटील जाधव, आनंराव, मोरे, भगवानराव मनूरकर, केरबा रायेवार, गजानन पाटील जुन्ने, सूर्याजी पाटील चाडकर, रामचंद्र बोडांरे, माधवराव ढगे, माधव पाटील, भास्करराव धर्माधिकारी, भाऊसाहेब देशमुख रुई बु, प्रकाश पाटील, विजय केशेटवार, केशव कदम, रावसाहेब पाटील कुदळेकर, मारोतराव कदम कुंटूरकर, पत्रकार तानाजी शेळगावकर आदी यावेळी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments