माधव पवार / मारोती इबितवार /
देगलुर तालुक्यातील करडखेड येथील जि.प.हायस्कूल येथे बायोस्टेड इंडिया लिमिटेड मुंबई या कंपनीतर्फे बायोझाईम प्रगती शिष्यवृत्ती वितरण करण्यात आले बायोस्टेड कंपनी भारतातील कृषी क्षेत्रातील अग्रगणे कंपनी आहे
गेल्या ३६ वर्षापासून गुणवत्तापूर्ण दर्जेदार कृषी उत्पादने बाजारात देते. बायोस्टेड कंपनी प्रत्येक जिल्ह्यातील एक शाळा निवडुन त्या शाळेतील गरीब शेतकरी कुटुंबातील अभ्यासू होतकरू १० विद्यार्थी निवडून प्रत्येकी विद्यार्थ्यांना अडीच हजार रुपये शिष्यवृत्ती दर वर्षी वाटप करण्यात येत आहे
नांदेड जिल्हातील देगलुर तालुक्यातील करडखेड जि.प.हायस्कूल शाळेतील स्फूर्ती इरवंत मुखेडे, कोमल सोपान झुडपे,वैभवी अविनाश गडपवार,सतीष संजय नामपल्ले,रुपनार शिवप्रसाद कोंडीबा,अनुश्का अनिल दोसलवार, वर्षा हनमंत मंडीलवार,सोहेल सैलानी सय्यद,प्रणव सायलू गुंडेलवार, सदरील विद्यार्थ्यांना शिष्यवृती व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष सोपानराव झुडपे होते. देगलुर येथील गणेश कृषी सेवा केंद्राचे मालक राजु सावकार अचिंतलवार नांदेड टेरीटरी मैनेजर विजयकुमार जोरूळे सर, शाळेचे मुख्याध्यापक दोमाटे सर, गंदिगुडे सावकार, कोंडावार सावकार, काजळे सावकार,राजु कोंडावार सावकार, आदींची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देगलुर प्रतिनिधी आशिष एकलारे, धर्माबाद प्रतीनिधी मारोती इबितवार सय्यद सर,काजळे,आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजळे यांनी केले तर आभार देगलुर प्रतिनिधि आशिष एकलारे यांनी मानले

0 Comments