किनवट प्रतिनिधी : किरण ठाकरे -
किनवट माहूर या अनुसुचित क्षेत्रातील शाळा बंद न करता त्या सुरूच ठेवाव्यात यासाठी आ.केराम यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचेकडे लेखी निवेदनातून मागणी केली असून आदिवासी बहुल भाग असलेला किनवट व माहूर तालुक्यातील ९३ शाळांना कायम सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना किनवट माहूरचे आ. भिमरावजी केराम यांनी दि.३० सप्टेंबर रोजी लेखी निवेदन देवून अनुसुचीत क्षेत्रातील जि.प.शाळा कायम ठेवणे बाबत निवेदनातून मागणी केली आहे. दरम्यान संचालक, (शिक्षण) पुणे यांनी १ ते २० विद्यार्थी पटसंख्या असलेल्या जि.प.च्या प्रा. शाळा बंद करण्याच्या संबंधाने धोरणात्मक निर्णय घेतला आहें
किनवट तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७१ शाळा व माहूर तालुक्यातील २२ अशा एकूण ९३ शाळा बंद होणार असल्याच्या पार्श्वभुमिवर उपमुख्यमंत्री फडणविस यांच्याकडे सदरची मागणी केली आहे.
विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातील किनवट व माहूर हे दोन्ही तालुके आदिवासी क्षेत्रबंधीत पेसा अंतर्गत असून या दुर्गम, डोंगराळ व मागसलेल्या भागात प्रामुख्याने, गोंड, कोलाम, परधान, आंध, भिल्ल, नाईकडा या जाती आदिवासी समुहाचे वास्तव्य आहे. त्यामुळे मा. संचालक यांच्या धोरणानुसार प्राथमिक शाळा बंद झाल्यास या भागातील बहुतांशआदिवासी वाडी, पाडयातील मुलांना प्राथमिक शिक्षणापासून वंचीत राहावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तर त्यांना इतरत्र डोंगर नाले, रस्त्याची अडचण यामुळे ते मुले शाळेतच जाऊ शकत नाहीत. त्यामुळे अनुसुचीत क्षेत्रातील जि.प.प्राथमिक शाळांना यातुन वगळून किनवट तालुक्यातील (७१) व माहूर तालुक्यातील (२२) असे एकुण ९३ कमी पटसंख्या असलेल्या शाळा पुर्ववत कायम ठेवण्याबाबत संबधीताना आदेश देण्याची मागणीही आ. केराम यांनी निवेदनातून केली आहे.

0 Comments