Header Ads Widget

चुडावा पोलीस ठाण्याचे सपोनि शिव प्रकाश मुळे यांच्यासह जमादार सूर्यकांत केजगीर यांनी तपासात आरोपीकडून हस्तगत केलेल्या बैलांची जोडी शेतकऱ्याच्या स्वाधीन केली " साहेबाचे आभार " शेतकरी " !! -


नायगाव फास्ट न्यूज - माधव पवार : थेट चुडावा --

परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातील चुडावा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सपोनि शिवप्रकाश मुळे यांच्यासह जेमादार सूर्यकांत केजगिर यांनी चोरीस गेलेल्या बैल जोडीचा आरोपीचा जल्द गतीने तपास करून सदरच्या तपासात आरोपी कडून हस्तगत केलेल्या बैलांची जोडी दिनांक ३ ऑक्टोबर २०२२'रोजी सदरच्या शेतकऱ्यांच्या बैल स्वाधीन पोलिसांनी केले आहे 
असल्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण पसरले आणि शेतकरी अतिशय आंनद व्यक्त केला असल्याचे सपोनि मुळे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले सदरच्या तीन आरोपीला न्यायालयात  उभे केले असता न्यायालयाने या तीन आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती आरोपी कडून एक टेम्पो आणि दोन बैल हस्तगत पोलिसांनी केले आहें 
 
तालुक्यातील चुडावा पोलिसांनी दिनांक २ ऑक्टोबर २०२२'रोजी या प्रकरणी अजदापूर येथील आरोपी राधाजी विश्वनाथ वैद्य महादू साहेबराव वैद्य व तिसरा आरोपी रियासत खान अब्बास खान पठाण राहणार जवळा पांचाळ तालुका कळमनुरी या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांच्या कडून मुद्देमाल एक टेम्पो व दोन लाल रंगाचे बैल ताब्यात घेतले टेम्पो जप्त करण्यात आला तर बैल जोडी शेतकऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले

" साहेबाचे मनःपूर्वक आभार -बैल जोडी मालक शेतकरी "

चुडावा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या अजदापूर येथील शेतकरी महादू नरारी हिवरे यांचे बैल ऑगस्ट महिन्यात चोरीला गेले होते बैल चोरी प्रकरणाचा तपास ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार पंडित, पोहेका  सूर्यकांत केजगिर हे केले होते सदरच्या आरोपीला अटक केल्यामुळे बैल जोडी मालकांमध्ये समाधान व्यक्त झाला आणि पोलिसांनी शेतकऱ्यांच्या स्वाधीन बैल जोडी केली जात आहे

Post a Comment

0 Comments