माधव पवार
शिवछत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्रात अंधा कानून ? सत्तेसाठी टोकाची भूमिका ! राजकारणाची ऐसी की तैसी महाराष्ट्र टिकवा म्हण्याची वेळ येत असून नुकत्याच पार पडलेल्या दसऱ्या मेळाव्याच्या माध्यमातून मुबंई येथे दोन दसरा मेळावे झाले एक उद्धव ठाकरे गटाचा आणि दुसरा शिंदे गटाचा या मेळाव्यामुळे तर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असाचे वास्तव चित्र दिसून आले आहेमहाराष्ट्र ही संताची भूमी आहे या संताच्या भूमीत शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला या पवित्र भूमीत राजकारणाला विचित्र दिशा मिळत आहे सत्तेसाठी राजकारणी टोकाची भूमिका घेत असल्यामुळे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात अंधा कानून ? चालतोय की काय असा प्रश्न अनेकांना पडताना दिसत आहे सदरच्या राजकारणात जनता होरपळून जात आहे शिवसेना पक्षात दोन गट पडल्यामुळे राजकारण वरच्यावर तापत जात असले तरी राजकारणाची " ऐसी की तैसी " महाराष्ट्र टिकवा अशी म्हण्याची गरज भासत आहे
राज्याचे विद्यमान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे विद्यमान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दोन मजबूत दोन गट निर्माण झाले एक उद्धव गट आणि दुसरा शिंदे गट यांची धनुष्यबाणासाठी लढाई निवडणूक आयोगाच्या दरबारात होती परंतु निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण गोठवून टाकले असल्यामुळे मा उद्धव ठाकरे गट व शिंदे गट हे सदरच्या चिन्हा पासून मोकळे झाले असले तरी त्यांची राजकीय लढाई कायम असल्याचे दिसून येत असल्यामुळे अख्या राज्यातील जनता डोळयांनी पाहत आहे

0 Comments