Header Ads Widget

हदगांव ते गोजेगाव रस्त्याचे वाजले की बारा गेल्या चार वर्षा पासून खोदून ठेवलेला रस्ता अद्याप पूर्ण होईना रस्त्या अभावी वाहन धारकांची वाहतूक विस्कळीत -संबंधित विभाग अधिकाऱ्याच्या डोळ्यावर पट्टी ? -


हिमायतनगर / हदगांव : नागोराव शिंदे - 

हदगांव ते गोजेगाव रस्त्याचे वाजले की बारा गेल्या चार वर्षा पासून खोदून ठेवलेला रस्ता अद्याप पूर्ण होईना रस्त्या अभावी वाहन धारकांची  वाहतूक विस्कळीत संबंधित विभाग अधिकाऱ्याच्या डोळ्यावर पट्टी ? -असल्यामुळे लोक प्रतिनिधीनी लक्ष दयावेत !

तुळजापूर ते नागपूर राष्ट्रीय राज्य महामार्ग असलेल्या रस्त्यावर गेल्या चार वर्षाखाली संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यानी पुलाचे काम करण्यासाठी मंजुरी घेतल्याचे समजते परंतु अद्याप सदरच्या पुलाचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे जनतेसह वाहन धारकाना नाहक त्रास सहन करावा लागत असला तरी सदरच्या फुलाचे व रस्त्याचे गेल्या चार वर्षा पासून बारा वाजले असताना सुद्धा या विभागाचे राजकीय लोकप्रतिनिधीसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याचे जाणूनबुजून दुर्लक्ष होत आहें
राष्ट्रीय राज्य महामार्ग अधीक्षक अभियंता यांना तुळजापूर ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग या रस्त्यावर वारंगा ते हदगाव महागाव या रस्त्यावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर शेकडो वाहनाची कोंडी झाल्याचे दृश्य पाहायला मिळाली असून सदरील रस्त्याचे काम करत असलेले गुत्तेदार असो की संबंधित विभागाचे अधिकारी यांचा असो यांच्या बेजबाबदारपणामुळे अशी अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होताना दिसून येत आहे अशी परिस्थिती निर्माण होत असतानाही या विभागातील राजकीय पुढारी गप्प का बसले आहेत हा जनतेसाठी चिंतनीय विषय असला तरी गेल्या दोन दिवसा पासून बंद आहे 
असल्यामुळे ऐन वेळी अशी पद्धतीच्या वाहनाची वाहतूक विस्कळीत होताना दिसून येत असून तुळजापूर ते नागपूर आणि हदगांव शहरातील गोजेगाव रस्त्याचे काम कधी ? पूर्ण होईल अशी अपेक्षा या विभागतील जनतेनी केली असली तरी संबंधित विभागाच्या डोळ्यावर पट्टी ? लागली असल्याचे सदरच्या जनतेतून व वाहन धारकातून बोलल्या जात असून अचानक या रस्त्यावर वाहतूकींची कोंडी झाली असल्याने स्थानिकच्या पोलीस प्रशासनाला सदरची वाहतूक सुरळीत करावी लागले आहे

वाहतूक कोंडी झाली असल्याचे चित्र तुळजापूर व नागपूर आणि हदगांव आणि गोजेगाव रस्त्यावर दिसून आले असून सदरचा हा विदर्भ मराठवाडा जोडणारा रस्ता हा आहें 


Post a Comment

0 Comments