Header Ads Widget

गोळेगाव जवळ कार मोटर सायकल अपघातात एक जन ठार ? दोन जखमी -

       माधव पवार
उमरी तालुक्यातील कारेगाव उमरी रस्त्यावरील वाघालवाडा फाट्याजवळ गोळेगाव येथील दुचाकीस्वार दुर्गामाता विसर्जन करून उमरीकडे येत असतांना कार व मोटरसायकलची जोरदार धडक बसून एक जण ठार झाला ? असल्याची माहिती मिळते तर दोन जण जख्मी झाल्याची घटना सायंकाळी संध्याकाळी ६ ते साडे वाजण्याच्या दरम्यान घडली असल्याचे सांगण्यात येते
उमरी - कारेगाव राज्यमार्ग दरम्यान तालुक्यातील गोळेगाव येथील गावातील तरुण दुर्गा विसर्जन करून गावाकडे  निघाले होते त्याच वेळेस उमरी कडून येणाऱ्या कार.क्र.एम एच १४, जि यू ३५६३ ची जोरदार धडक ? झाली यामध्ये दुचाकीस्वार  गोळेगाव  येथील जागीच ठार ? झाला तर अन्य दोन जण गंभीर जख्मी झाले असल्याचे कळते आहे
धडक एवढी जोराची होती की,कारच्या दोन्ही एअर बॅग बाहेर निघाल्या आहेत घटने दरम्यात्या रस्त्यावरून येणारे उमरी नगरपरिषदेंचे कार्यालयीन वरिष्ठ लिपिक गणेश मदने यांनी घटनेची माहिती उमरी पोलिस स्टेशनला देवून जख्मीना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहें दुर्गा विसर्जन दरम्यान गोळेगाव येथील युवकांची घटना घडल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.




Post a Comment

0 Comments