Header Ads Widget

" प्रेम हे आंधळं असते म्हणतात" प्रियकरासाठी मोठया बहिणी कडून लहान बहिणीची हत्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात - कोपरगाव तालुक्यातील घटना -


" प्रेम हे आंधळं असते म्हणतात" प्रियकरासाठी  मोठया बहिणी कडून लहान बहिणीची हत्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात - कोपरगाव तालुक्यातील घटना  - 

नायगाव फास्ट न्यूज नेटवर्क - कोपरगाव -

प्रियकरासाठी लहान बहिणीची हत्या मोठया बाहीनेने केली असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे  हत्यतील आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना घटना घडल्या नंतर तीन दिवसांनी कोपरगाव शहर पोलिसांनी मयत मुलीची मोठी बहीण व तिचा प्रियकर हिला श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथून ताब्यात घेतले होते या घटनेत शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्याच्या नंतर पोलिसांनी याची कसून चौकशी केली सदरचा तपास योग्य रितीने मयत मुलीची आई संगीता नवनाथ बानकर वय ४० वर्ष हिच्या फिर्यादी वरून मयत मुलीची मोठी बहीण सृष्टी नवनाथ बानकर १९  हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहेसदरील घटनेची सविस्तर अधिक माहिती अशी की आरोपी तरुणीचे श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील एका आकाश राजेंद्र कांगुने या नाच्या मुला सोबत प्रेम संबंध होते व तिला आकाश याने दिलेला मोबाईल मयत मुलगी हर्षदा हिने यापूर्वी पकडून तिच्या आई वडिलांना दिल्याने व तिचे प्रेम प्रकरण उघड झाले व तिचे कॉलेजात जाणे बंद झाल्याने त्याचा राग तिच्या मनात धरून आरोपी मोठी बहीणचे प्रेम संबंध असलेला मुलगा आकाश राजेंद्र कांगुणे याच्या सोबत घरातून पळून जाण्याच्या तयारीत असताना यातील मयत मुलगी हर्षदा हिने तिला विरोध केल्याने आरोपी तरुणी सृष्टीने मयत हर्षदा हिचा कापडी ओढणीने गळा आवळून ठार केले आहें 

 या दरम्यान सदर गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहेत का ? याबाबतचा तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष निरीक्षक वासुदेव देसले हे करीत आहे
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातील नगर मनमाड महामार्गा लगत असलेल्या तीनचारी जवळील रहिवासी असललेली अल्पवयीन मुलगी वय वर्ष १६ हीचा आपल्या राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहें येथील नागरिकात वेगळेच चर्चेला उधाण आले होते सदरची घटना घडल्याच्या मयत मुलीची मोठी बहीण ही आपल्या प्रियकरासोबत फरार झाली होती त्यामुळे संशयाच्या भावऱ्यात मयत मुलीची बहीण सापडली होती याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती


Post a Comment

0 Comments