माधव पवार
नायगाव फास्ट न्यूज नेटवर्क - मुबंई :-
अख्ख्या राज्यातील व देशाचे जनतेचे लक्ष लागून असलेल्या मुंबईच्या दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते परंतु या बीकेसी मैदानावर सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ही दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता परंतु ह्या मेळाव्याच्या भाषणातून शेतकऱ्यांच्या हितासाठी नेमक काय ? होत फक्त राजकीय नेते मंडळी एकमेकांवर टीका शस्त्र सोडीत ठसके बाजी व फटके बाजीचे भाषण केले आहें
राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी एक ही शब्द कोणत्या ही नेत्यांनी बोलले नाही स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी व मुंबईच्या दसरा मेळावा गाजवून दाखविण्यासाठी जनतेचे शक्ती प्रदर्शन करण्यात आले शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमाला महासागर उसळला होता आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ही दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमाला गर्दी उसळी होती परंतु या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीच बोलले नाही आहे
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात ज्या रावणाचे दहन करायचा आहे तो रावण म्हणजे ५० खोकी तोंडाचा धोकासुर आणि खोखासुर रावणाचे दहन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले आज पर्यंत दहा तोंडी रावण होता असे ते म्हणाले असून दोन्ही सभेला तुफान गर्दी होती आणि दोन्ही नेत्यांनी एकमेकांना चिमटे काढले आणि टीका केली आणि मैदानी तोफी ही उडविल्या आहेत
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, कट करणारा म्हणजेच कटअप्पा तर एकनाथ शिंदे त्यांना उत्तर देताना म्हणाले कटप्पा दुटप्पी तरी नव्हता दोन्ही बाजूंनी दावे झाले की त्यांचीच शिवसेना ही खरी शिवसेना आहे आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांना गद्दार म्हटलं गेले असून यात शेतकऱ्यांच्या हितासाठी व राज्याच्या विकासाठी महत्वाचे आजी माजी मुख्यमंत्र्यांनी काहीच बोलले नाहीत ---का -? -

0 Comments