Header Ads Widget

कर्ज बाजारी सह सततच्या नापिकेला कंटाळून केरूर शिवारात डोनगाव खुर्दच्या शेतकऱ्यांनी लिंबाच्या झाडाला गळपास घेऊन केली आत्महत्या रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना : पोलीस घटनास्थळी रवाना सपोनि संकेत दिघे -


      माधव पवार 
बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या डोनगाव खुर्द येथील कर्ज बाजारी व सततच्या नापिकीला कंटाळून एका ४४ वर्षीय शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात असलेल्या धुर्‍यावर लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक २८ ऑक्टोबर २०२२  रोजी सकाळी ९ ते दहा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे सदरच्या शेतकऱ्यांनी कर्ज बाजारी व सततच्या नापीकीला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला आहे
सदरची घटना रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हदीत घडली असल्यामुळे ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांना रवाना केले आहे
तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या डोणगाव खुर्द येथील कर्ज बाजारी शेतकऱ्यांनी केरूर शिवारात असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या धूऱ्या वरील लिंबाच्या झाडाला गळफास घेतली असल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सदर शेतकऱ्यांचे प्रेत ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे 
सदरची दुर्दैवी घटना ही डोणगाव खुर्द येथे घडली आहे सदरचे रहिवासी असलेले आत्महत्या ग्रस्त शेतकरी मयत आत्माराम व्यंकटी मोकनपल्ले वय ४४ वर्ष राहणार डोनगाव खुर्द यांनी कर्ज बाजारीसह सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे सपोनि दिघे यांनी नायगाव फास्ट न्यूजला  बोलताना ही माहिती दिली आहे

Post a Comment

0 Comments