Header Ads Widget

जिओ कंपनीसह आयडिया कंपनी कडून मोबाईल धारकाची आर्थिक लूट रेंजचा बेपत्ता असल्याने ग्राहक वैताकले - रेंज सोडा - अन्यथा टॉवर कायमचे बंद करावे लागेल


      माधव पवार 
जिओ कंपनीसह आयडिया कंपनी कडून मोबाईल धारकाची आर्थिक लूट रेंजचा बेपत्ता असल्याने ग्राहक वैताकले - रेंज सोडा - अन्यथा टॉवर कायमचे बंद करावे लागेल असा इशारा मोबाईल धारकांनी दिला आहे 
ग्रामीण भागासह खेड्यापाड्यात जनसामान्य माणूस हजारो रुपयांची मोबाईल खरेदी करून जिओ कंपनीचे कार्ड खरीदी केले व त्याच बरोबर आयडिया कंपनीचे सुद्धा मोबाईल धारक कार्ड वापरत असतात परंतु जिओ कंपनीसह आयडिया कंपनीने मोबाईल धारका कडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करीत असल्याने मोबाईल धारक चांगलेच वैतागले असल्याचे दिसून येत असून गेल्या अनेक महिन्या पासून आयडिया व जिओची रेंज नसल्यामुळे मोबाईल धारक कमालीचा वैतागला आहे
जिओ कंपनी चालकांनी व आयडिया कंपनी चालकांनी मोठं मोठाले ऑफर दिल्यामुळे जास्तीचे ग्राहक त्याकडे वळले आहेत आणि आता सदरच्या कंपन्या आपलीच मनामनी चालवीत असल्याचे दिसून येते सदरच्या टॉवरची रेंज नाही सोडल्यास मोबाईल धारकास वेगळा पवित्रा घ्यावा लागेल अथवा कायमचे टॉवर बंद करावे लागतील असा इशारा नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सदरचे मोबाईल धारक यांनी दिला आहे
जिओ कंपनी धारकांनी सुरुवातीला मोठा गाजा वाजा करत मोबाईल धारकाचा जिओ कंपनी व आयडिया कंपनी कार्ड देऊन कमी किमतीत देऊन विश्वास संपादन केले आहे 

परंतु सध्याच्या परिस्थितीत जिओला सुद्धा रेंज नाही  रेंज नाही नेट चालत नाही फोन लागत नाही अशा अनेक समस्या जिओ कंपनीच्या टॉवरमुळे अडचणी येत आहेत आणि आयडिया कंपनीची सुद्धा रेंज येत नाही या दोन्ही टॉवरची चांगलीच बोंब असल्यामुळे मोबाईल धारकात संताप व्यक्त केला जात असून सदरच्या कंपन्यांनी मोबाईल धारकाची आर्थिक लूट करीत रेंज न सोडता फसवणूक केली आहे 



Post a Comment

0 Comments