माधव पवार
नांदेड शहारातील गुन्हेगाराचा गर्दन काळ म्हणून ठरलेले वजीराबाद पोलीस ठाण्याचे सपोनि संजय निलपत्रेवार यांनी चालत्या वाहनातून मोबाईल चोऱ्या करणाऱ्या दोन गुन्हेगाराला घेतले ताब्यात २१ मोबाईलसह दोन लाख ९४ हाजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशा प्रमाणे वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या सुचने नुसार ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डी निलपत्रेवार हे गुन्हेगाराला आळा बसविण्याचे काम करीत आहेत व गुन्हेगाराचा गर्दन काळ म्हणून ओळखले जातं आहेत
वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी अनेक गुन्हेगाराला आळा बसविण्याचे काम पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी निलपत्रेवार पोनि दत्तराम जाधव, गजानन किडे, विजय कुमार नंदे, शरदचंद्र चावरे, संतोष बेलूरोड, व्यंकट गंगूलवार, शेख इम्रान या पोलीस टीमच्या सहकार्याने करीत आहेत
वजिराबाद पोलीस ठाण्याचे सपोनि संजय निलपत्रेवार यांच्या पोलीस टीच्या दमदार कारवाईमुळे नांदेड शहारातील गुन्हेगार चालत्या वाहनातून अनेक लोकांचे मोबाईल हिसकावून घेऊन पलायन करणाऱ्या गुन्हेगारास वजीराबाद डीबी पथकाच्या पोलीस अधिकारी यांनी दोन गुन्हेगारास ताब्यात घेतले त्यांच्या कडून चौकशी केली असता दोन लाख ३४ हजारांचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहे
वजीराबाद पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डी निलपत्रेवार व यांच्या टीमने अनेक घटनेत गुन्हेगाराला आळा बसण्याचे धाडसत्र चालू असतानाच दोन मोबाईल चोरांना ताब्यात घेतले या गुन्ह्यातील आरोपी शैलेश मिलिंद नरवाडे व २१ वर्षे व्यवसाय मिस्त्री राहणार आंबा नगर सांगवी नांदेड आरोपी नंबर दोन राजरत्न मारोती कदम वय २६ वर्षे व्यवसाय मिस्त्री काम राहणार नांदेड यांच्या कडून कबुली देऊळ हिंगोली गेट ते रेल्वे स्टेशन ते बस स्टँड व चंदासिंग कॉर्नर अशा ठिकाणी चालत्या मोटर सायकल वरून अनेक लोकांचे मोबाईल इस्काऊन घेतल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले आहे
पोलीसानी सदरच्या आरोपीच्या घरांची झाडा झडती घेतली असता त्यांच्या घरात वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल दोन लाख ३४ हजार रुपयाचे किमतीचे मोबाईल आरोपी कडून मिळून आले असल्यामुळे सपोनि निलपत्रेवार यांनी जप्त केले तर या गुन्ह्यात वापरलेली टीव्ही कंपनीची व्हिक्टर मोटर सायकल तिची किंमत साठ हजार रुपये असे एकूण दोन लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल वजीराबाद पोलीस ठाण्याचे सपोनी संजय डी निलपत्रेवार यांनी जप्त केली असल्यामुळे त्यांच्या कर्तव्यांचे वरिष्ठासह जनसामान्य माणसातून कौतुक करण्यात येत असून सदरचे सपोनि गुन्हेगारांचा गर्दन काळ ठरले आहेत

0 Comments