Header Ads Widget

बिलोलीच्या दारू बंदी अधिकाऱ्याच्या वसुल्या चालू मात्र कारवाईचे नांव नाही असे कसे दारू बंदी अधिकारी पोलीसानाच माराव्या लागतात दारू अड्डयावर वर धाडी

      माधव पवार
बिलोलीच्या दारू बंदी अधिकाऱ्याच्या वसुल्या चालू मात्र कारवाईचे नांव नाही असे कसे दारू बंदी अधिकारी पोलीसानाच माराव्या लागतात दारू अड्डयावर वर धाडी मारून सदरच्या आरोपीना जेरबंद करून घाम फोडीत असल्याचे चित्र अनेक वेळा पाहवयास मिळालेले आहे 

बिलोलीचे आयपीएस अर्चित चांडक यांनी पदभार स्विकारला तेव्हा पासून अनेक मोठं मोठया अवैध देशी अड्डयावर धाडी मारून आरोपीना जेरबंद केले आणि संबंधित पोलीस पोलीस ठाण्याच्या अंतर्गत चालत असलेले देशी दारूचे अड्डे पोलीसांनी उध्वस्त केले परंतु दारू बंदी अधिकाऱ्यानी मात्र महिन्याच्या महिन्याला दारू दुकाना वरून ढाब्यावर जाऊन महिन्याची वसुली केली मात्र कुठलीच कारवाई केली नसल्यामुळे चित्र स्पष्ट दिसून येत आहे
तालुक्यासह ग्रामीण भागात खुले आम देशी विदेशी दारूची अनाधिकृत विक्री होत असताना सुद्धा बे कायदेशीर चालणाऱ्या दारू विक्रीवर बंदी घालण्या ऐवजी दारू बंदी अधिकारी नावाच असल्याचे दिसून येत असून खेड्यापाड्यात जागो जागी खुलेआम देशी विदेशी देशी दारू मिळत असल्याने अनेकांचे संसार उध्दवस्त  होण्याच्या मार्गावर आहेत असे जनतेतुन बोलल्या जात आहे 
प्रशासनाच्या दरबारात दारू बंदी कायदा नावालाच उरला असल्यामुळे देशी दारूचा सर्वत्र उत्त आला असल्यामुळे देशी ढोसून तळीराम देशी अड्डयावर व व रस्त्यावर मेढंरा प्रमाणे लोळत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहवायास मिळत असताना सुद्धा दारू बंदीच्या अधिकाऱ्याचे जाणूनबुजून दुर्लक्ष होताना दिसत असून अवैध देशी अड्डयावर यांनी धाडी मारीत नाहीत तर असे कसे हे दारू बंदी अधिकारी असा प्रश्न चर्चेला जाताना ऐकावयास मिळत आहे 

Post a Comment

0 Comments