माधव पवार / नागोराव शिंदे :- हिमायतनगर -
राज्यात सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे नांदेड ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चौंडी शहापूरचा
ब्रिटीश कालीन पूल दिनांक २१२०२२ रोजी मुसळधार पावसाने दुपारी कोसळला असल्याची घटना घडली पहाटे चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान पासून या भागात मुसळधार पाऊस सुरु झाला आणि औंढाला आलेल्या मोठया पुरामुळे पुलाचा छेत कोसळून गेला सुदैवाने काही जीवित हानी झाली नसल्याचे सांगण्यात येत असले तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यानी वेळीच लक्ष दिले असते तर सदरची घटना टाळली असती या रस्त्याला अगोदरच तडे गेल्याचे सांगण्यात येत आहे
प्रशासनाला माहिती देण्यात आली होती आणि प्रशासन अगदी सज्ज होत
ओंढा नागनाथ तहसीलदार व हट्टा पोलीस ठाण्याला ग्रामस्थांनी माहिती दिली त्यानुसार घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन तहसीलदार कृष्णा कानगुले नायब तहसीलदार सचिन जोशी हट्टा पोलीस ठाण्याचे सपोनि गजानन बोराटे उपनिरीक्षक सतीश तावडे यांनी पथकासह धाव घेतली. दुर्घटना टाळण्यासाठी या भागात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे
सदरचा ब्रिटिश कालीन पूल कोसळून गेल्यामुळे नांदेड कडून औरंगाबादला जाणारी वाहने वसमत झिरो फाटा मार्गे परभणीच्या दिशेने वळवण्यात अली आहेत तर ओंढा मार्गावरून नांदेडकडे जाणारी वाहने नागेश्वरवाडी मार्गे झिरो फाटा मार्गे वळवण्यात अली आहेत
सदरचा पूल पुरामुळे कोसळून गेला असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येते पूल कोसळून गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली असल्याचे दिसून आले आहे
राज्यासह ग्रामीण भागात गेल्या जुलै महिन्या पासून सतत मुसळधार पाऊसाने झोड उठवल्यामुळे औंढा नागनाथ तालुक्यासह शिरड शहापूर पिंपळदरी येळेगाव सोळंके जवळा बाजार पोटा भागात मोठ्या प्रमाणात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला त्यामुळे नदी नाले ओढे तुडूंब वाहत आहेत अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असल्याचे चित्र असून नांदेड औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या चौंडी शहापूर येथे ब्रिटीश कालीन पुलाचा भाग पुराच्या पाण्यामुळे कमकुवत झाला असल्यामुळे व भेगा पडल्या होत्या असे सांगण्यात येत आहे
0 Comments